छत्रपती संभाजीमध्ये २१०० शाळांमध्ये स्टेम ग्रंथालय, मुलांसाठी मिळणार निवड केलेली १०० सचित्र पुस्तके

जिल्ह्यात २१०० स्टेम ग्रंथालये स्थापन करताना प्रत्येक ग्रंथालयामध्ये मुलांसाठी खास निवड केलेली १०० सचित्र पुस्तके असतील.
Library
Library Sakal
Updated on

ज्ञानार्जनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘प्रथम बुक्स’तर्फे जिल्ह्यातील दोन हजार १०० शाळांमध्ये स्टेम ग्रंथालये स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक ग्रंथालयामध्ये मुलांसाठी खास निवड केलेली १०० सचित्र पुस्तके असतील. मंगळवारी (ता. १६) ग्रंथालयांतील पुस्तकांच्या वाटपाचा सोहळा जिल्हा परिषद सीईओ विकास मीना यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी हिमांशू गिरी, अविनाश रावत, व्यंकट सुधाकर, डॉ. सुनीता राठोड, संजयसिंग, रेश्मा अग्रवाल, प्राचार्या देशमुख, अविनाश रावत, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ व गीता तांदळे यांची उपस्थिती होती. ‘‘विद्यार्थ्यांमध्ये शोध घेण्याची मनोवृत्ती वाढविण्यासाठी या ग्रंथालयाची रचना करण्यात आली आहे. या पुस्तकांमध्ये विज्ञान, गणित विषयांवरील विविध विषयांचा समावेश असलेल्या गोष्टी आहेत;

तसेच सोपी यंत्रे, अपूर्णांक, वनस्पतींचे जीवनचक्र यांची सुलभ पद्धतीने मांडणी आणि सुंदर चित्रे मुलांना गुंतवून ठेवतील. त्यामुळे ती स्टेम शिक्षणात परिवर्तन

घडवून आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावू शकतात’’, असे हिमांशू गिरी म्हणाले.

या पाठ्यपुस्तक वितरणाच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रथम बुक्सचे रविराज, विस्ताराधिकारी संगीता सावळे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. सोज्वल जैन यांनी केले. प्रवीण लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले.

Library
India Post Recruitment: पोस्ट खात्यात 44,228 पदांसाठी 'मेगा भरती'; 5 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

काय आहे पुस्तकात?

जिल्ह्यात २१०० स्टेम ग्रंथालये स्थापन करताना प्रत्येक ग्रंथालयामध्ये मुलांसाठी खास निवड केलेली १०० सचित्र पुस्तके असतील. कुतूहल आणि शोध घेण्याची मनोवृत्ती वाढविण्यासाठी यांची रचना करण्यात आलेली आहे. या पुस्तकांमध्ये विज्ञान आणि गणित विषयांवरील विविध विषयांचा समावेश असलेल्या गोष्टी आहेत; तसेच सोपी यंत्रे, अपूर्णांक, वनस्पतींचे जीवनचक्र आदी विषयांचा वेधही या पुस्तकांमध्ये घेण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.