- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
परीक्षा, स्पर्धा यासह विविध गोष्टींचा ताण आणि दबाव यामुळे मुले, तरुण तणावग्रस्त होतात. यातूनच काही जण टोकाचा निर्णय घेतात. पालक या नात्याने तुमच्या मुलांच्या मनातील ताण जावा, भीती जावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहायला हवे. योग्य वेळी मुलांना आधार द्यायला हवा. त्यासाठी घरातील वातावरण, एकमेकांमधील संवाद खेळीमेळीचा असायला हवा. याशिवाय आणखी काय काय करता येऊ शकते, हे आपण जाणून घेऊया.