अमरावती : पुस्तकांविना शाळा चालविण्याचा 'अभिनव उपक्रम' शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शिक्षकांकडून होणारी ओरड दुर्लक्षित करून विनापुस्तकी (student not get books) शाळा भरविण्यात येत आहे. शाळा सुरू होऊन अडीच महिने लोटूनसुद्धा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत पुस्तके मिळालेली नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलेले आहे.
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताच शासनाच्या निर्देशानुसार 28 जूनपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, यंदा ती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे जुनी पुस्तके गोळा करून शिक्षकांच्या माध्यमातून ती दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. नंतर पुन्हा शासन आदेशात बदल करण्यात आला. त्यानंतर सेतू अभ्याक्रमाचा घाट घालण्यात आला मात्र त्यालाही स्थगिती मिळाली, या दरम्यान शाळांकडून पुस्तकांची मागणी नोंदवून घेण्यात आली. गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपूर्ण डेटा सोपविण्यात आला. मात्र, अडीच महिने उलटून सुद्धा एकाही विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचली नाहीत, ही वास्तविकता आहे.
पुस्तके गेली तरी कुठे? -
शाळांकडून नोंदविण्यात आलेली मागणीनुसार, पाठ्यपुस्तकांचे वितरण तालुकास्तरावर करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते, तर शिक्षक ते मानण्यास तयार नाहीत, अखेर पाठ्यपुस्तके गेली तरी कुठे? हा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही शिकविणार तरी कसे? -
पाठ्यपुस्तके अद्यापही प्राप्त झालेली नाहीत. विद्यार्थी नियमित शाळेत हजर राहताहेत. कसे तरी अॅडजस्टमेन्ट करून आम्ही मुलांना शिकवीत आहोत. एकाच पुस्तकावर दोन ते तीन विद्यार्थी शिकविणे सुरू आहे, असे एका शिक्षकाने सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.