विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी आता ऑनलाइन! शिक्षण विभागाचा निर्णय

विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी आता ऑनलाइन! राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला निर्णय
School
SchoolSakal
Updated on
Summary

राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी आता हजेरी बुकमध्ये न नोंदवता ती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर सोलापूर : राज्याच्या शिक्षण विभागाने (Department of Education) विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी आता हजेरी बुकमध्ये न नोंदवता ती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्र सरकारने निश्‍चित केलेल्या पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्‍स) (Performance Grading Index) मध्ये गुण मिळविण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

School
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार पदांची भरती

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती ही हजेरी पत्रकामध्ये नोंद केली जाते. दररोज आल्यानंतर हजेरीपत्रक भरण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. मात्र हेच हजेरीपत्रक आता ऑनलाइन भरावे लागणार आहे. फक्त विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक ऑनलाइन भरावे लागणार नाही तर शिक्षकांचीही हजेरी आता ऑनलाइन भरावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्या शाळेतील कोणत्या इयत्तेमध्ये किती विद्यार्थी उपस्थित आहेत, याची माहिती दिल्लीत बसून सरकारला समजणार आहे. त्याचबरोबर कोणत्या शाळेत किती शिक्षक उपस्थित आहेत हेही या नव्या प्रणालीमुळे समजणार आहे.

महा स्टुडंट या ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन हजेरी नोंदविण्याचे काम केले जाणार आहे. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन हे ऍप डाऊनलोड करून त्याद्वारे ही संपूर्ण माहिती दररोज भरायची आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थी संख्या भरण्यासाठी आता वेगळे काही करायची गरज नाही. यापुढे शालेय पोषण आहारातील विद्यार्थी संख्या भरणे व महा स्टुडंट या ऍपद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी भरणे या दोन्ही प्रक्रिया एकत्रित केल्या जाणार आहेत. त्यामुळे शिक्षकांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

दररोज लेखी स्वरूपात विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक भरण्याची कटकट आता शिक्षकांना नसणार आहे. त्याऐवजी ऑनलाइन हजेरी पत्रक भरून विद्यार्थ्यांची उपस्थिती दर्शविली जाणार आहे. तीच प्रक्रिया शिक्षकांच्या उपस्थिती बाबतही लागू पडणार आहे.

School
38 हजार विद्यार्थी नॉट रिचेबल! लसीकरणाचे गूगल फॉर्म भरलेच नाहीत

बोगस विद्यार्थी पडणार उघड

राज्यातील अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवल्याचा आरोप वारंवार केला जातो. एकच विद्यार्थी अनेक शाळांमध्ये प्रविष्ट झाल्याचेही अनेक वेळा सांगितले जाते. मात्र या नव्या प्रणालीमुळे बोगस विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा येण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर एखाद्या शाळेत जर बोगस विद्यार्थी असतील तर ते आता उघड होणार आहे. त्यामुळे शाळा यापुढे बोगस विद्यार्थी दाखविणार नाहीत, अशी आशा शासनाला निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.