Degree Exam : परीक्षा लांबल्यामुळे परदेशी जाणारे विद्यार्थी चिंतेत; प्रवेश रद्द होण्याची भिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले असून, यंदाही उन्हाळी परीक्षांना जून-जुलै महिना उजाडला आहे.
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune Universitysakal
Updated on

पुणे - पदवीला प्रवेश घेतल्यापासूनच श्रद्धाने पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आता अवघ्या काही आठवड्यात तिचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. मात्र, लांबलेल्या परीक्षांमुळे वेळेत गुणपत्रक मिळणार की नाही, यामुळे ती चिंतेत आहे. त्यात १२ आणि १३ जून रोजी होणारे पेपर थेट २९ जून आणि १० जुलैला ‘पोस्टपॉंड’ करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेनंतर निकाल आणि गुणपत्रक मिळायला सप्टेंबर उजाडण्याची शक्यता असून, तो पर्यंत ब्रिटनच्या विद्यापीठात एम.एस्सी.साठी घेतलेला प्रवेश रद्द होण्याची भीती आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले असून, यंदाही उन्हाळी परीक्षांना जून-जुलै महिना उजाडला आहे. त्यात परीक्षा पार पडल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी विद्यापीठाला मोठे दिव्य करावे लागत आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील समन्वयाच्या अभावामुळे काही विषयांची पेपर तपासणी संथ गतीने झाल्याची अनेक उदाहरणे आहे.

Savitribai Phule Pune University
Education News : राज्याला मिळणार पाच शैक्षणिक दूरचित्रवाहिन्या

त्यामुळे यंदा त्याचीच पुनरावृत्ती होत परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत गुणपत्रक मिळणार की नाही, याचीच भीती आहे. परदेशातील अनेक विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, ऑगस्टचा शेवटचा आठवडा किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बहुतेक परदेशी महाविद्यालये सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत गुणपत्रके मिळणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या..

- गुणपत्रक वेळेत मिळाले नाही तर परदेशातील प्रवेश रद्द होते

- विद्यार्थ्यांसह पालकांचे अनेक वर्षाचे प्रयत्न निष्फळ ठरतात

- आर्थिक नुकसाना बरोबरच मानसिक त्राग्यालाही सामोरे जावे लागते

- निदान ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात तरी निकालपत्र मिळणार का?

Savitribai Phule Pune University
Teacher Recruitment : राज्यात शिक्षकांच्या तब्बल अठरा हजार जागा रिक्त; पाच वर्षे लोटली तरी भरती होईना

भीती कशाची?

- पोस्टपॉंड झालेल्या परीक्षेचा निकाल वेळेत लागेल का?

- उत्तरपत्रिका तपासणीसाठी पुरेसे प्राध्यापक पुढे येत नाही, पर्यायी प्रक्रिया लांबते

- २० दिवसांपेक्षा कमी कालावधीत निकाल घोषित होईल का?

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या आमच्या निदर्शनास आली आहे. त्यानुसार वेळापत्रकात आवश्यक बदल केले आहे. परीक्षे संदर्भातील अडचणींसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राचार्यांशी संपर्क करावा. प्राचार्यांनी परीक्षा विभागाशी चर्चा करत योग्य मार्ग काढण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.