- प्रा. सुभाष शहाणे
आज आपले जीवन इंटरनेटमुळे अधिक सुखकर झाले आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांचा कल ऑनलाइनकडे झुकत असल्याने कंपन्या डिजिटल मार्केटिंगला अग्रकम देत आहेत. जाहिरातीचे प्रमुख साधन म्हणून डिजिटल मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
‘डिजिटल मार्केटिंग’ म्हणजे काय?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाइन मार्केटिंग. संभाव्य ग्राहकांना खरेदीसाठी ज्याद्वारे प्रवृत्त केलं जातं आणि त्यासाठी उत्पादित मालाचं किंवा सेवेचं ब्रॅन्ड प्रमोशन इंटरनेटद्वारे किंवा डिजिटल कम्युनिकेशनच्या माध्यामातून केलं जातं, त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल कम्युनिकेशनमध्ये प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर केला जातो.
ई-कॉमर्सची भूमिका
ई-कॉमर्स म्हणजे इंटरनेट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वस्तू व सेवांच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया होय. यामध्ये पुढील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा/प्रकारांचा समावेश होतो - इलेक्ट्रॉनिक डाटा एक्स्चेंज, इलेक्ट्रॉनिक मेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर, इलेक्ट्रॉनिक बुलेटिन बोर्ड. या क्षेत्रात फ्लिपकार्ट प्रा .लि व अमेझॉन इंडिया या कंपन्या ऑनलाईन बिजनेसमध्ये अग्रेसर आहेत.
या कंपन्या B2C,(Business TO Consumer), B2B, C2C या प्रकाराची कामे करतात. C2C मध्ये OLX व E-BAY SITES कार्यरत आहेत. या सर्व गोष्टींमुळे कोणत्याही कंपनीला किंवा व्यावसायिकाला डिजिटल मार्केटिंगचा उपयोग व्यवसायवाढीसाठी करणं आवश्यक वाटतं.
प्रकार/चॅनल्स
डिजिटल किंवा ऑनलाइन मार्केटिंगमधून संभाव्य ग्राहकांना कंपनीचे उत्पादन व सेवेची, ब्रॅन्डची माहिती करून दिली जाते व खरेदीसाठी उद्युक्त केले जाते. त्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन प्रकार पडतात. ऑनलाइन मार्केटिंगमध्ये Search engine optimization (SEO), Search Engine Marketing (SEM), Social Media Marketing (SMM), Pay-Per-Click Advertising (PPC), Content Marketing, Affiliate Marketing, Email Marketing यांचा समावेश होतो. ऑफलाइनमध्ये रेडिओ, टीव्ही, फोन यांचा समावेश होतो.
फायदे
इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकापर्यंत, तसेच संभाव्य ग्राहकापर्यंत जलद गतीने पोहचता येते. वस्तू-सेवांची जाहिरात, ब्रॅन्ड प्रमोशन, स्थानिक ग्राहकांपासून ते देशा-परदेशातील ग्राहकांना आकर्षित करणे सोपे होते. डिजिटल मार्केटिंगचे माध्यम हे इतर पारंपरिक माध्यमांपेक्षा स्वस्त व किफायतशीर आहे. किती लोकांनी वेबसाईट /जाहिरात पहिली याची नोंद ठेवता येते. डिजिटल मार्केटिंगला भौगोलिक मर्यादा नसतात.
अभ्यासक्रम
डिजिटल मार्केटिंगचे अनेक कोर्सेस आहेत. त्या अभ्यासक्रमांची यादी पुढीलप्रमाणे आहे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या BBA-(CA) अभ्यासक्रमात डिजिटल मार्केटिंग विषय घेण्यात आला आहे . तसेच, CDMM, SEO, SMM, E-Mail Marketing, Mobile Marketing, Inbound Marketing, Growth Hacking असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
(लेखक अप्पासाहेब जेधे कॉमर्स कॉलेज, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.