Success Story of IAS Vishakha Yadav: पुणे : स्पर्धा परीक्षांमध्ये किती अनिश्चितता असते, हे ती परीक्षा देणाऱ्यांना चांगलंच माहीत आहे. तुम्हाला यश मिळेल की नाही, याबाबत काहीही सांगता येत नाही. वारंवार प्रयत्न करूनही अनेकांना यश मिळत नाही. तर काहींना पहिल्या प्रयत्नातही मिळून जातं. अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतर यश पदरी पडलेल्यांची नावेही कमी नाहीत. त्यापैकी एक नाव म्हणजे विशाखा यादव.
विशाखासारखे असे मोजकेच आहेत ज्यांनी चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडत स्पर्धा परीक्षा देण्याची जोखीम स्वीकारली. यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळालं. पण हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. दोनदा परीक्षा दिल्यानंतरही पूर्वपरीक्षा पास होता आली नाही. यामुळे साहजिकच प्रचंड तणाव येऊ शकतो. पण अशाही परिस्थितीत धीर न सोडता प्रयत्न करणारेच यशस्वी ठरले. थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय म्हणत विशाखानेही आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि यूपीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नात ती देशात सहावी आली. एका मुलाखतीमध्ये विशाखाने तिच्या प्रवासाबद्दल आणि चुकांमधून तिने काय धडा घेतला याबद्दल सांगितले.
आई-वडिलांचं स्वप्न होतं...
आयएएस होण्यासाठीच्या प्रवासाबद्दल बोलताना विशाखा म्हणाली की, तिने लहानपणीच नागरी सेवा क्षेत्रात जाण्याचं स्वप्न पाहिल. इतकेच नाही तर तिच्या आई-वडिलांचीही हीच इच्छा होती. दिल्लीत जन्मलेली विशाखा नेहमीच एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली गेली. बारावीनंतर तिने इंजिनीअरिंग केलं आणि दोन वर्ष एका कंपनीतही नोकरी केली. पण नोकरीत मन रमत नव्हतं. त्यामुळे तिने नोकरी सोडत यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या दोन प्रयत्नांत केलेल्या चुका टाळल्या
खूप पुस्तके आणि नोट्स गोळा करणं चुकीचं ठरल्याचं विशाखानं कबूल केलं. खूप सोर्सेस असल्याने रिव्हिजन करता आलं नाही, ही पहिली चूक. दुसरं म्हणजे तिने खूप कमी मॉक टेस्ट दिल्या होत्या, ज्यामुळे तिचा व्यवस्थित अभ्यास होऊ शकला नाही. या परीक्षेसाठी मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे असं विशाखाचं म्हणणं आहे. किती प्रश्न सोडवल्याने कटऑफ पर्यंत पोहचू शकतो हे कळतं तसंच तुमचा सरावही होतो, असं विशाखा म्हणाली.
तसेच सातत्य असणंही गरजेचं आहे. एक-दोन दिवस अभ्यास करून काही होत नाही. यासाठी काही दिवस किंवा काही महिने सतत अभ्यास करावा लागतो. अभ्यास तो पर्यंत करा जोपर्यंत यश मिळत नाही.
विशाखा पुढे म्हणाली की, या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे हिंमत सोडू नका. सतत प्रयत्नशील राहा. कुठे कमी पडत असाल, तर ती भरून काढण्याकडे लक्ष्य द्या. छोट्या वाटणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच यश मिळू शकते.
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.