Success Story : घरोघरी वृत्तपत्रं वाटणारा विशाल बनला CA; शेतीत राबणाऱ्या आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण

अभ्यासात सातत्य, मोठे होण्याची जिद्द, चिकाटी व प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे विशाल हे आहेत.
Newspaper vendor Vishal Jagtap passed CA exam
Newspaper vendor Vishal Jagtap passed CA exam esakal
Updated on
Summary

साताऱ्यानजीक असलेल्या लिंब या गावातील पहिला सीए बनण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

सातारा : घरोघरी वृत्तपत्रे वाटणाऱ्या लिंब (ता. सातारा) येथील विशाल मारुती जगताप (Vishal Jagtap) यांनी सीए (सनदी लेखापाल) परीक्षेतून (CA Exam) यशाला गवसणी घातली. शेतीत राबणाऱ्या आपल्या आई-वडिलांचे त्याने स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे.

लिंब येथील विशाल यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याला शिक्षणाची मोठी आवड होती. आई-वडील शेतात राबत होते. त्यामुळे आपल्या शिक्षणाला मदत व्हावी, यासाठी विशालने लिंब येथील वृत्तपत्र विक्रेते ताजुद्दीन आगा यांच्याकडे सात वर्षे घरोघरी वर्तमानपत्र वाटपाचेदेखील काम केले.

Newspaper vendor Vishal Jagtap passed CA exam
Jain Muni Case : जैन मुनींच्या हत्येबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; सिद्धरामय्या म्हणाले, तपास CBI कडं देण्याची..

अभ्यासात सातत्य, मोठे होण्याची जिद्द, चिकाटी व प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे विशाल हे आहेत. त्यांनी नुकतेच सीए परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. साताऱ्यानजीक असलेल्या लिंब या गावातील पहिला सीए बनण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी हे यश संपादित केले. यश सातत्याने हुलकावणी देत असताना त्यांनी चिकाटी न सोडता हे यश संपादित केले.

Newspaper vendor Vishal Jagtap passed CA exam
Maharashtra Politics Update : मुश्रीफांसारख्या दिग्गजाविरोधात जिद्दीनं लढा; 'या' नेत्याला मिळणार निष्ठेचं फळ, लोकसभेसाठी तीन नावं चर्चेत

त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण गोडोलीतील विशाल सह्याद्री माध्यमिक विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कला व वाणिज्य कॉलेजमध्ये तर उच्च शिक्षण धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा येथे पूर्ण केले. विशाल यांना सत्यजित भोसले व ओंकार तिखे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.