युपीएससी परीक्षेत विदर्भाच्या विद्यार्थ्यांचे यश

महाराष्ट्रासह नागपूरच्या निकालाचा टक्का वाढला
UPSC
UPSCsakal
Updated on

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल शुकवारी जाहीर झाला. यात महाराष्ट्रासह नागपूरच्या निकालाचा टक्का वाढला आहे. त्यात वर्धेच्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा विद्यार्थी संकेत ढोके याने देशातून २६६ वा रॅंक मिळविला आहे. याशिवाय नागपूर शहरातून स्नेहल ढोके यांनी ५६४ रँक, याशिवाय नागपूरच्या पूर्व प्रशिक्षण केद्रातील श्रीकांत मोडक (४६६), प्रणव ठाकरे (४७६),स्वरूप दीक्षित (७४९), आदित्य जिवणे (३९९) यांनी बाजी मारली आहे.

नागरी सेवा मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात आल्या. त्याचा निकाल मार्च रोजी जाहीर होऊन यात उत्तीर्ण होण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्यात मुलाखती घेण्यात आल्यात. यात नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. नुकत्याच दिल्लीत मुख्य परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात वर्धेतील संकेत वाघे याने २६६ वा रॅंक मिळविला आहे. त्याला प्रशासकीय सेवेत संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय मुळच्या यवतमाळ येथील आणि नागपूर येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या स्नेहल ढोके यांनी देशात ५६४ रँक मिळवली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरचे संचालक डॉ. लाखे यांनी केंद्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर केंद्राच्या वतीने अधिकाधीक निकाल देण्यावर भर देण्यात येईल असे आश्वाासन दिले.

UPSC
UPSCचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात अव्वल; 761 जणांची नियुक्ती

जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या अधिकारी

स्नेहल ढोके या जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागात नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. यूपीएससी पास करणाऱ्या गेल्या दशकातील त्या पहिल्याच अधिकारी आहेत. यापूर्वी एका महिला नायब तहसीलदार यांनी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा पास केली आहे. देशातील एक वर्ग असा आहे की, जो अनेक सोई सुविधांच्या प्रवाहापासून बरेच दूर आहेत. या सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय सेवेचा मार्ग पत्करण्याचे स्वप्न लहानपणापासून पाहिले होते अशी प्रतिक्रिया स्नेहल ढोके यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()