कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: सुहास चव्हाण देशात 11 वा

चार वर्षांपासून करत असलेल्या प्रयत्नांना यश ;सुहास चव्हाण
सुहास चव्हाण
सुहास चव्हाणsakal
Updated on

हळदी (कोल्हापूर) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वनसेवा परीक्षेत कांडगाव (Kandgaon)(ता. करवीर) येथील सुहास मधुकर चव्हाण याने देशात ११ वा क्रमांक मिळविला. शुक्रवारी सायंकाळी निकाल लागला. ग्रामीण भागातील युवकाने मिळवलेल्या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सुहास चव्हाण याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण कांडगाव हायस्कूलमध्ये झाले. शालेयस्तरावरील अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये त्याने बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच पी.ई.सी.टी. कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटी खरगपूरमधून त्याने एम.टेक पूर्ण केले आहे.

२०१६ पासून त्याने दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. गेल्या वर्षी त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली होती, मात्र यातून खचून न जाता त्याने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि यश मिळविले. गेल्या वर्षी झालेल्या पूर्व परिक्षेनंतर आयोगामार्फत यावर्षी २८फेब्रुवारी आणि २ ते ७ मार्च या कालावधीत मुख्यपरीक्षा झाली. यातून मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची ऑक्टोबरमध्ये मुलाखती झाल्या होत्या. याचा शुक्रवारी सायंकाळी निकाला लागला. देशभरातून ८९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुहास चव्हाण ११ वा आला आहे. शालेयस्तरापासूनच अभ्यासाचा पाया भक्कम झाल्यामुळेच हे यश मिळाल्याचे त्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Summary

ग्रामीण भागातील युवकांनी मनामध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रयत्न करावेत. देशपातळीवरील परीक्षेत नक्की यश मिळते.

सुहास चव्हाण
जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले

चार वर्षांपासून करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान आहे, पण सध्या युपीएससीची पुन्हा तयारी सुरू असून, भविष्यात आय.ए.एस. साठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील युवकांनी मनामध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रयत्न करावेत. देशपातळीवरील परीक्षेत नक्की यश मिळते. शालेय वयातच शिक्षणाचा भक्कम झालेला पाया आपल्या यशाच्या इमारतीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.

सुहास चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.