CA परीक्षा : सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील

CA
CAesakal
Updated on

चार्टर्ड अकाउंटेंट म्हणजेच CA परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने CA की परीक्षेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. कोर्टाने सांगितले आहे की, ''ICAI परीक्षा घेऊ शकते.''. (supreme-court-gives-nod-to-ca-physical-exams-to-begin-from-5th-july)

कोर्टाने ICAI ला कोरोनामुळे संक्रमित आहे किंवा कोरोनानंतर त्रास होत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्ट आउट पर्यायाचा विचार करण्यासाठी सांगितले आहे

CA
गणेशोत्सव 2021: गणेशमूर्तींच्या उंचीबद्दलचे निर्बंध कायम

CA च्या परिक्षेला स्थगित देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली आहे. 5 जूलैला सीएची परीक्षा होणार असून प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा घेण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. 5 जुलैला होणाऱ्या परीक्षेला स्थगित करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती ज्यावर आज सुनावणी करण्यात आली. या याचिकेत सुप्रीम कोर्टातून विद्यार्थ्यांचा ऑप्ट-आउट पर्याय, अतिरिक्त प्रयत्नांसाठी मार्गदर्शन सुचनांची देखील मागणी केली होती. त्याचबरोबर, आयसीएआय सीए फाइनल, इंटर आणि फाउंडेशन परीक्षा 2021 साठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

CA
कोवीड लसीकरणात महावितरणची आघाडी; ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

ICAI खंडपीठाने आयसीएआयला ऑप्ट आऊट पर्याय निवडण्यासाठी कोरोना संबधित मुद्दयांबाबत एखाद्या उमेदवाराला प्रमाणित करु शकते अशी समिती स्थापन करण्यास सांगितले. ICAI ने म्हटले आहे की ते सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशींची अंमलबजावणी करेल. उद्या याबाबत ICAI माहिती देईल आणि या प्रकरणी बुधवारी सुनावणीही होईल.

इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India ICAI) ने सुप्रीम कोर्टाला आधी सांगितले होते की ते 5 जुलैला होणारी परीक्षा रद्द करण्याच्या किंवा स्थगित करण्याच्या विरोधात आहे.

CA
'मोदीजी, जाहीरातींचे शूट अन् भाषणांमधून वेळ मिळाला तर हे काम करा'

CA परीक्षाचे महत्व सांगताना ICAI ने सांगितले, ''कोरोनाबाधितांची संख्या फार कमी झाली आहे. ज्यांना चार्टेड अकाउंटें बनन्यासाठी इच्छुकांना सीए परीक्षा घेण्यासाठी ही वेळ आहे.

ICAI ने SC ला सांगितले की , सीए ही एक व्यावसायिक परीक्षा आहे आणि त्याची तुलना सीबीएसईशी करू नये. इच्छुक चार्टर्ड अकाउंटंटच्या हितासाठी ते पुढे ढकलले किंवा रद्द केले जाऊ शकत नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()