- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
सहानुभूती हा शब्द आपण अनेकदा वापरतो किंवा आपल्या कानावरूनही जातो. इतरांच्या भावना समजून घेण्याची, त्यांना काय वाटत असेल त्याचा अंदाज बांधण्याची व त्यानुसार त्यांना आधार देण्याची क्षमता म्हणजे सहानुभूती. सहानुभूती हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो.