Helicopter Crash : ब्रिगेडियरच्या मृत्यूनंतर मुलीच्या पुस्तकाला मोठी मागणी

Ashana Lidder
Ashana Lidderesakal
Updated on
Summary

ब्रिगेडियरच्या 17 वर्षांच्या मुलीनं लिहिलेलं पुस्तक बाजारात मोठ्या प्रमाणात विकलं जातंय.

Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर (Brigadier L. S. Lidder) यांची मुलगी आशना लिड्डर हिनं लिहिलेलं पुस्तक सध्या दुकानात विकलं जात आहे. 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील (Tamil Nadu) कुन्नूर येथे झालेल्या अपघातात ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या 17 वर्षांच्या मुलीनं लिहिलेलं पुस्तक बाजारात मोठ्या प्रमाणात विकलं जातंय. गेल्या 4 दिवसांत हे पुस्तक एवढं विकलं गेलंय, की त्याचा स्टॉक आता संपलेला आहे.

या दुःखाच्या प्रसंगी ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर (Lakhwinder Singh Lidder) यांची 17 वर्षांची मुलगी आशना लिड्डर हिनं दाखवलेली जिद्द पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. योगायोगानं गेल्या काही दिवसांपासून तिच्या इन सर्च ऑफ ए टायटल (In Search of a Title : Musings Of A Teenager) या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढलीय. या पुस्तकात किशोरवयीन मुलीचे अनुभव, चिंतन आणि शिकण्याच्या प्रवासाचं वर्णन केलंय. हे पुस्तक आता स्टोअरमध्ये उपलब्ध नाहीय.

Ashana Lidder
'ती' घटना घडली नसती, तर जनरल रावत आमच्यासोबत असते : राष्ट्रपती

आशनाचे प्रकाशक क्रिएटिव्ह क्रोज (Creative Crows) म्हणाले, अचानक तिच्या या पुस्तकांची मागणी प्रचंड वाढलीय. आता आम्ही पुस्तकाच्या आणखी प्रती प्रकाशित करत आहोत. 250 प्रती आधीच विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी अनेक लोक येत असून त्यामुळं आम्ही प्रकाशनाचं काम सुरू केलंय. लिड्डर कुटुंब सध्या दु:खात पहायला मिळतंय. आशनाची आई तिची समजूत काढतेय. आशना लिड्डर सध्या बारावीत शिकत असून बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओत आशना अभिमानानं तिच्या वडिलांबद्दल बोलताना दिसतेय.

In Search of a Title : Musings Of A Teenager
In Search of a Title : Musings Of A Teenager
Ashana Lidder
ट्विट, कँडल मार्चनं भाजपचा पराभव करणं कठीण : प्रशांत किशोर

आशनाचे प्रकाशक गानिव चढ्ढा (Ganiv Chadha) म्हणाले, काही दिवसांपूर्वीच ब्रिगेडियर लिड्डर यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन टप्पे पार केले. अलीकडेच ब्रिगेडियर आणि त्यांच्या पत्नीनं लग्नाचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा केला. या कार्यक्रमात ब्रिगेडियर म्हणाले, मी गीतिकाचं 25 वर्षे नेतृत्व केलं, परंतु आता पुढील 25 वर्षे मी तिच्या पावलावर पाऊल टाकेन, असं ते म्हणाले होते. चढ्ढांनी सांगितलं की, ब्रिगेडियर लिड्डर यांना त्यांच्या मुलीचं पुस्तक लवकरात-लवकर प्रकाशित करायचं होतं. दिवाळीची तारीखही ठरली. पण, गीतिका आणि आशना यांनी थँक्सगिव्हिंग डेच्या (Thanksgiving Day) दिवशी पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()