सध्याचे विद्यार्थी परीक्षाधार्जिणे झालेले आहेत. वर्षभर केलेले पाठांतर एकदा प्रश्नपत्रिकेत उतरविले, की विद्यार्थी रिकामे होतात. कोरोनामुळे परीक्षाच झालेल्या नाहीत. दहावी व बारावीचा निकाल न भूतो न भविष्य असा लागला. आभासी गुणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर करण्याची स्वप्न पडत आहेत. आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या आपल्या कुवतीला झेपणार नाही अशा स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी व त्यात करिअर करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. प्रत्यक्षात करिअर म्हणजे काय? याचे आकलन होण्याची नितांत आवश्यकता आहे
करिअरचा खरा अर्थ
पैसा कमावण्यासाठीचे उत्तम क्षेत्र शोधून त्यात नोकरीधंदा करणे म्हणजे करिअर, असा अर्थ आपल्याकडे प्रचलित आहे. करिअर म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान, गलेलठ्ठ पगाराची नोकरी असे बरेच अर्थ काढले जातात आणि ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस धावपळ केली जाते. पैसा कमावणे हेच करिअर आहे का? पैसा सर्वस्व आहे, पैशाने करिअर होते असे तरुणांना का वाटते याची कारणे...
लहानपणापासून त्यांच्यावर दबाव आणलेला दबाव
बौद्धिक क्षमतेचा विचार न करता करिअरसाठी पळवणे
भावनिक दबाव व वेगवेगळी आमिषे दाखविणे
मुलांच्या आवडीनुसार करिअरचा योग्य मार्ग न दाखविणे
योग्यवेळी करिअर प्लॅनिंग आणि गायडन्स आवश्यक
करिअर म्हणजे एखाद्या क्षेत्रात स्वतःला वाहून घेणे, पैसा हा दुय्यम असतो. त्या क्षेत्रात काम करायला मिळण्याची पात्रता कमावणे, अभिमान वाटेल असे करता येणे म्हणजे करिअर.
योग्य मार्गदर्शनाचा अभाव
दहावी पास झाल्यानंतर विज्ञान शाखा, मग वाणिज्य आणि काही नाही जमल्यास कला शाखेत.
खासगी शिकविण्यांचे भरमसाट शुल्क भरून विद्यार्थी गुणांच्या स्पर्धेत पळतात.
आजचा विद्यार्थी अर्धवट माहिती, अपुरे ज्ञान, क्रेझ आणि कमी कष्टांत दणदणीत पॅकेज मिळवण्याच्या मोहात अडकला आहे.
भरपूर पॅकेज देणारे, बिनकष्टाचं करिअर हवेय. त्यासाठी लागणारी माहिती, मेहनत, वेळ नको आहे.
डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस कोर्सेसच्या मागे धावतात. सगळ्यांपाठोपाठ आपणही जायचे का?
समाधान लाभेल असे हटके, वेगळे करिअर निवडा.
करिअर निवडण्यामागची कारणे
आयुष्य आनंदी, शांत, स्थिर, कणखरपणे जगण्यासाठीचे चांगले गुण आपल्यात विकसित न झाल्यास पदवी मिळवूनही आपण अशिक्षितच राहतो.
करिअर करायचे कशासाठी?
बुद्धिमत्तेला, स्वत:तल्या क्षमतांना न्याय देण्यासाठी.
पैसा, प्रतिष्ठा ही उद्दिष्ट्य ओघाने येतात.
आपल्या आयुष्याची योग्य दिशा गवसणे आणि स्वत:मधील क्षमतेची पुरेपूर खात्री पटणे हे यशाचे गमक.
त्याला कष्टाची जोड द्यावी. पैसा नाही मिळाला तरी चालेल, परंतु काहीतरी वेगळे करण्याची धमक ठेवा.
सामाजिक क्षेत्रातही करिअरच्या संधीचा फायदा अनेकजण घेत आहेत.
काय काळजी घ्याल?
पहिल्यापासून आपल्या आवडीनिवडींना शास्त्रशुद्ध पद्धतीने ओळखून त्याच्याशी संबंधित क्षेत्रात व्यवसाय नोकरी करा.
यासाठी दूरदृष्टीची, मेहनत घेण्याची, समाजाच्या विचित्र नजरा आणि प्रश्न झुगारून द्यायची हिंमत पाहिजे.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचे धाडस ठेवत त्यातूनच समाधान, पैसा, प्रतिष्ठा मिळून करिअर घडते.
पोर्टलवर सर्च करा...
विद्यार्थ्यांना करिअर विषयीची माहिती मिळण्यासाठी शासनाने महाकरिअर पोर्टलची निर्मिती केली आहे. एका क्लिकवर कृषी, कला, वाणिज्य, विज्ञान, स्पर्धा परीक्षा, गणवेशधारी सेवा अशा सात क्षेत्रातील १६ देशातील ५५६ पेक्षा जास्त करिअर संधी, ११५० पेक्षा जास्त एन्ट्रान्स परीक्षांची माहिती, १२५० पेक्षा जास्त वेगवेगळ्या शिष्यवृत्ती व २१००० महाविद्यालयांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. हे पोर्टल अगदी निःशुल्क आहे. कोणीही करिअर विषयी माहिती घेऊ शकते. लक्षात ठेवा, पैशासाठी करतो तो नोकरीधंदा म्हणजे करिअर नव्हे, किमान एवढ्या भ्रमातून बाहेर आलो तरी उत्तम होईल.
- प्रा. तात्यासाहेब काटकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.