शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; 'TET'ची परीक्षा पुढच्या महिन्यात

tet exam
tet examtet exam
Updated on
Summary

२०१९ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० ला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही टीईटी झाली नव्हती.

शिरोली पुलाची : केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगाची लेखी परीक्षा १० ऑक्टोबरला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) (TET Exam) तारीख पुढे ढकलली असून ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात (Maharashtra) ही परीक्षा होणार आहे. ‘टीईटी‘ची तारीख बदलल्याने युपीएससी परीक्षा देणाऱ्या भावी शिक्षकांना दोन्ही परीक्षा देता येणार आहेत. (Education News)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन वर्षांनंतर शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा (टीईटी) १० ऑक्टोबरला घेणार असल्याचे जाहीर केले होते. २०१९ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० ला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही टीईटी झाली नव्हती. त्यामुळे १० ऑक्टोबरला होणारी टीईटी भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे ; मात्र केद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षेचा २७ जूनला रद्द झालेला पेपर १० ऑक्टोबरला घेणार आहे.

tet exam
राज्यातील 'या' जिल्ह्यांत काही तासात मुसळधार; 'हवामान'ने वर्तवला अंदाज!

टीईटी देणारे बहुतांश भावी शिक्षकांनी युपीएससीसाठीही अर्ज केला असल्याने नेमकी कोणती परीक्षा द्यायची? असा प्रश्‍न परीक्षार्थीना पडला होता. यामुळे परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत होती. यानुसार परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रकात जाहीर केले आहे.

१० ऑक्टोबरला युपीएससीची लेखी परीक्षा असल्याने टीईटी परीक्षेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेद्वारे आगामी शिक्षक भरती होणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ३१ रोजी परीक्षा द्यावी,असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

tet exam
ऑस्ट्रेलियाला भूकंपाचा धक्का; मेलबर्न हादरले

दोन वर्षानंतर घेण्यात येणारी टीईटी भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे. टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी भूमिका 'सकाळ' मधून मांडली आणि परीक्षेची तारीख पुढे ढकलली. याचा फायदा भावी शिक्षकांना होईल.

- विजयसिंह माने, अध्यक्ष, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()