TET आणि UPSC परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थी संभ्रमात

TET आणि UPSC परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थी संभ्रमात
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेकडे पाठ फिरवावी लागणार आहे. १० ऑक्टोबरला येणाऱ्या टीईटीच्या परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

राज्यात १० लाखांहून अधिक बी. एड. धारक बेरोजगार असून, शासकीय अनुदानित शाळांमधील भरतीसाठी २०१३ पासून महा टीईटी घेण्यात येत आहे. जानेवारी २०२१ मध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, कोरोना प्रार्दुभावामुळे ही परीक्षा होऊ शकली नाही. दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या परीक्षेचा अखेरीस १० ऑक्टोबर रोजी मुहूर्त ठरला आहे. विद्यार्थी कार्यकर्ता दत्तात्रेय फडतरे म्हणाले,‘‘काही महिन्यांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा याच दिवशी होणार असल्याचे घोषित केले आहे. शिक्षण विभागाने याबाबत कोणताही विचार न करता, त्याच दिवशी टीईटी परीक्षा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. लाखो उमेदवार परीक्षा देण्याचे नियोजन करत असतात. परंतु, एकाच वेळी दोन्ही परीक्षा देणे गैरसोयीचे ठरणार आहे.’’ या संबंधी फडतरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. टीईटीचा ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट आहे. त्यामुळे अजूनही अर्जांची संख्या वाढणार आहे.

TET आणि UPSC परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थी संभ्रमात
मॉल, रेस्टॉरंट, मंदिरं उघडण्याबाबत एकमत, पण...

आकडे बोलतात...

टीईटीला २०२० मध्ये बसलेली संख्या ः ३ लाख ४३ हजार

यावर्षी टीईटीसाठी आजवर आलेले अर्ज ः २० हजार

यूपीएससीची पूर्व परीक्षा देणारे राज्यातील उमेदवार (अंदाजे) ः ७ ते ८ लाख

दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या (अंदाजे) ः २५ ते ३० हजार

तारखेतील बदल आवश्यक ः

- प्रथमच दोन्ही परीक्षा एकत्र

- दीर्घकाळ कोणतीच भरती नसल्यामुळे दोन्हीकडे अर्ज भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

- एकाचवेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास शक्य नाही

- टीईटीची तारीख बदलताना निदान आठ दिवसांचा फरक आवश्यक

TET आणि UPSC परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थी संभ्रमात
दिल्लीवरुन थेट 'मातोश्री'वर, संजय राऊत- उद्धव ठाकरे यांच्यात खलबतं

यूपीएससी आणि महाटीईटीची तारीख एकाच दिवशी आली आहे. म्हणून परीक्षेचा कालावधी बदलावा, यासंबंधी आमच्याकडे तरी तक्रार आलेली नाही. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास शासनाकडे यासंबंधी आम्ही पाठपुरावा करू.

- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

कोरोनामुळे दीड वर्षापासून कोणतीच भरती नाही. त्यामुळे राज्यातील बहुतेक बी.एड. धारक विद्यार्थ्यांनीही महाटीईटी बरोबरच यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा अर्ज भरला आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा असल्यामुळे आता नक्की कोणती परीक्षा द्यायची, असा प्रश्न अनेकांच्या पुढे आहे. निश्चितच टीईटीची तारीख बदलायला हवी.

- निसर्ग बागदानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.