- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लससुजाण पालकत्व कसं असावं हे समजून घेताना ७-७-७ चा नियम फार महत्त्वपूर्ण ठरतो. हा नियम म्हणजे नक्की काय? त्याचा आयुष्याच्या विविध टप्प्यांवर उपयोग कसा होतो? याबाबतची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत..अंतिम सात वर्षे (१४-२१) - तारुण्य : मार्गदर्शनाची गरजएकदा तुमचं मूल १४ वर्षांचं झालं की, ते तारुण्याच्या उंबरठ्यावर उभं असतं. या काळात मुलांना पालकांनी आपल्याला काही शिकवावं, सांगावं, प्रशिक्षित करावं असं वाटत नाही. त्यांना स्वातंत्र्य हवं असतं आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतः विकसित करायचं असतं. योग्य की, अयोग्य याबाबतचे निर्णय त्यांना स्वतःला घ्यायचे असतात. त्यामुळे या काळात त्यांना तसं करण्याची परवानगी द्या..या महत्त्वाच्या काळात त्यांच्याशी मैत्री करा आणि आवश्यक असल्यास त्यांना मार्गदर्शन करा. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट समानतेच्या विचाराला धरून बोलाल तेव्हा ते अधिक मोकळेपणाने बोलतील. मुलांना आगामी काळात करिअर, नोकरी, लग्न असा मोठा प्रवास करायचा असतो. त्यामुळे या काळात त्यांना स्वतःची आवड ठरवण्याचं स्वातंत्र्य द्या. त्यामुळे मुले निर्भय होतील.पालक म्हणून त्यांना आवश्यक तिथे पाठिंबा द्या आणि त्यांच्या आनंदात-दुःखात-काळजीत सहभागी व्हा. त्यांना चुका करू द्या. त्या चुकांमधून ते स्वतः अनेक गोष्टी शिकतील. त्यांची स्वतःची निवड करू द्या, पण ही जाणीवही त्यांना असू द्या की, काहीही झालं तरी ते तुमच्याकडे परत येऊ शकतात, बोलू शकतात..पालकत्वाचा हा ७-७-७ चा नियम जर तुम्ही पाळला, तर तुमचा पालकत्वाचा प्रवास अधिक सुकर, आनंददायी होईल. तुमचे मुलांबरोबरचे नाते केवळ पालक म्हणून न राहता मित्रत्वाचे होईल. पालकत्वाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी TheIntelligencePlus या यू-ट्यूब चॅनेलला किंवा pranjal_gundesha या इन्स्टाग्राम पेजला नक्की भेट द्या..पहिली सात वर्षे (०-७) - पायाभरणी : तुमच्या मुलांसोबत खेळाखेळ हा या वयोगटातील मुलांसाठी शिकण्याचे सर्वोच्च माध्यम आहे. आपण कुठलाही विचार न करता त्यांच्यासोबत अगदी लहान होऊन खेळावं असा हा काळ आहे. गोंधळात टाकणारे मजेशीर खेळ, नाट्यमय गोष्टी सांगणं, मैदानी खेळ अशा बऱ्याच गोष्टींमध्ये मुलांना गुंतवून ठेवा. त्यांना खेळण्यासाठी भरपूर वेळ द्या.या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मुले त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाने सतत प्रभावित होत असतात आणि निरीक्षणातून खूप गोष्टी शिकतात. मुलं त्यांच्या आई-वडिलांचं इतरांपेक्षा जास्त अनुकरण करतात. तुम्हाला तुमच्या मुलामध्ये काही चुकीचं वर्तन आढळल्यास, तुम्ही आधी स्वतःला तपासा. घरातील कोणी तसं वागतं आहे का? याचा शोध घ्या..मुलांशी खेळ खेळल्याने तुमचे त्यांच्याशी असलेले संबंध अधिक दृढ होतात. नातं घट्ट होतं. ते पुढे दीर्घ काळ टिकतं. दुर्दैवाने हा पायाच जर कमकुवत राहिला, तर येणारी पुढील वर्षे अधिक आव्हानात्मक होत जातात. त्यामुळे भरपूर खेळा आणि मुलांबरोबर वेळ घालवा.मधली सात वर्षे (७-१४) - प्राथमिक तयारी : शिकण्याचा काळएकदा मुले सात वर्षांची झाली की, ती तर्क आणि विचार करण्यासाठी तयार होतात. मुले नैसर्गिकरित्या शिकण्यासाठी आणि तर्क करण्यासाठी तयार असतात. त्यात त्यांना गतीही असते. त्यामुळे या संगोपनाच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्याशी नैतिकता, आध्यात्म, विश्वास आणि संवेदनशीलता याबाबत साध्या-सोप्या शब्दांत बोला..या टप्प्यावर, मुले लहान असतात आणि ते अजूनही योग्य-अयोग्य ठरवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी कसं वागावं, त्यांनी कोणाची संगत धरावी आणि कोणत्या प्रकारच्या वातावरणात राहावं हे निवडण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा. योग्य तिथे मर्यादा घाला. मुलांना त्यांच्या वर्तनाच्या मर्यादांची जाणीव करून द्या. त्यामुळे मुलांना वागण्याचे स्वातंत्र्य मिळते, पण जबाबदारीही कळते.हा टप्पा आयुष्यभर नैतिक होकायंत्रासारखा काम करतो. पालक या नात्याने, कुटुंबातील प्रत्येकासाठी (स्वतःसह) नियम आणि सीमा निश्चित करणं आणि त्यांचं पालन का केलं पाहिजे हे आपल्या मुलांना समजावून सांगणं आवश्यक असतं. ते आवर्जून करा. मुलांना तार्किक प्रश्न आवडतात, म्हणून तुम्ही शांतपणे त्यांना प्रश्न विचारू द्या..जमेल तसं उत्तर द्या. खोटी उत्तरे देऊ नका. त्यांना सर्व खेळांत सक्रियपणे सहभागी करून घ्या. यामुळे सांघिक भावना, नेतृत्व, खिलाडूवृत्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि यश-अपयश समजतं. महत्त्वाचं म्हणजे, त्यांना शैक्षणिक अभ्यासाच्या पलीकडे नेणारी कौशल्ये शिकवा. विचार मांडणं, मतं ठरवणं, नियोजन आणि अंमलबजावणी, ध्येय निश्चित करणं, चिकाटी, परिस्थितीचं विश्लेषण करणं ही कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत करा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.