पॉलिटेक्निकची परीक्षा होणार; एमसीक्यू पॅटर्नसाठी असणार सुविधा

पॉलिटेक्निकची परीक्षा होणार; एमसीक्यू पॅटर्नसाठी असणार सुविधा
Updated on

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) शाळा व कॉलेज बंद आहेत. तसेच परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने तशी घोषणाही केलेली आहे. कोर्टाने ३१ जुलैच्या अगोदर निकाल जाहीर करण्याचे आव्हान केले आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये आनंद तर काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परीक्षा न घेता निकाल कसा जाहीर करणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून विचारला जात आहे. याला कोणी समर्थन करीत आहे तर कोणी विरोध करीत आहे. असे असले तरी तांत्रिक शिक्षण परिषदेने (Technical education council) पॉलिटेक्निक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचे (Annual examination of Polytechnic announced) निश्चित केले आहे. (The annual-examination-of-the-Polytechnic-will-be-held-in-the-month-of-July)

पॉलिटेक्निक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचे निश्चित झाले असून, परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तसा आदेश तांत्रिक शिक्षण परिषदेने काढलेला आहे. मात्र, ही परीक्षा मल्टीपल चॉइस प्रश्न (एमसीक्यू) पॅटर्नवर घेण्याचे सांगितलेले आहे. ही परीक्षा अल्प कालावधीची मल्टीपल चॉइस प्रश्न (एमसीक्यू) परीक्षा असेल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना ९० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. या दीड तासात विद्यार्थ्यांना ५० एमसीक्यू उत्तर द्यावे लागणार आहेत.

पॉलिटेक्निकची परीक्षा होणार; एमसीक्यू पॅटर्नसाठी असणार सुविधा
आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत

तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव सुनील कुमार सोनकर यांनी यासंदर्भात २२ जून रोजी पॉलिटेक्निक महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालक यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात विद्यार्थी घरी स्मार्टफोन, लॅपटॉप व डेस्कटॉपचा वापर करून ही परीक्षा देऊ शकतात, असा उल्लेख केलेला आहे. तसेच सायबर कॅफेतूनही परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा दोन भागांत घेण्यात येणार आहे. लवकरच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेशी संबंधित अधिक माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल.

लवकरच जाहीर होणार मॉक परीक्षेची तारीख

राज्यातील १४१ शासकीय आणि १,२१७ खासगी पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तंत्रशिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापूर्वी पॉलिटेक्निक संस्थांना सॉफ्टवेअरची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी मॉक परीक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. लवकरच मॉक टेस्टची तारीख जाहीर केली जाणार आहे.

पॉलिटेक्निकची परीक्षा होणार; एमसीक्यू पॅटर्नसाठी असणार सुविधा
हे आहेत श्रीमंत फूटबॉलपटू; संपत्तीबद्दल वाचून बसेल धक्का

... अन्यथा विद्यार्थी राहणार जबाबदार

पॉलिटेक्निकने विद्यार्थी प्रथमच ऑनलाइन परीक्षा देणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून मॉक परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेला मॉक परीक्षला हजर राहणे गरजेचे आहे. जो विद्यार्थी मॉक परीक्षेला हजर राहणार नाही तो स्वतः याला जबाबदार राहील.

मल्टीपल चॉइस प्रश्न पॅटर्न

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मल्टीपल चॉइस प्रश्न (एमसीक्यू) पॅटर्नवर होणार आहे. एमसीक्यू आधारित पेपरमध्ये सर्व विषयांचे विभाग असतील. अंतिम सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी एकच पेपर असेल. इतर सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० गुणांचे दोन प्रश्नपत्रिका सोडवावे लागतील.

(The annual-examination-of-the-Polytechnic-will-be-held-in-the-month-of-July)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()