मुले यशस्वी होण्यासाठी त्यांचे पालनपोषण करणे हे केवळ कठोर परिश्रम किंवा नशिबाचा भाग नसते, तर त्यासाठी मुले कोणत्या वातावरणात वाढतात? त्यांची दैनंदिनी काय आहे? त्यांच्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे? याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे असते. सजग पालकत्वाच्या या शेवटच्या भागामध्ये आपण पालकांच्या काही महत्त्वाच्या सवयींची माहिती घेणार आहोत. त्यांचा अंगीकार केल्यास पालकत्व सहज, सोपे आणि आनंदी होईल.