विज्ञान शाखेकडेच जायचे हा दुराग्रह सोडून वाणिज्य शाखेकडे येणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केवळ विज्ञान शाखेतच संधी असतात आणि इतर क्षेत्रात नसतात, या गैरसमजुतीतून समाज आता बाहेर पडत आहे. ‘देअर इज ऑलवेज एम्टी स्पेस ॲट द टॉप’ असे इंग्रजीत एक वाक्य आहे. अर्थात कोणत्याही क्षेत्रात वरच्या स्तरावर संधीच संधी असतात, पण असे वरच्या स्तरावर कधी जाता येते, तर जेव्हा आपल्या त्या-त्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमता आणि आवडी जुळतात तेव्हा. क्षमता नसताना केवळ समाजाचा दबाव म्हणून एखादे क्षेत्र निवडले तर अपघात होण्याची शक्यता अधिक! जे विज्ञान या क्षेत्राला लागू आहे तेच वाणिज्य क्षेत्राला!