आरोग्य विभागाची परीक्षा ठरलेल्या वेळेतच!

आरोग्य विभागाची परीक्षा ठरलेल्या वेळेतच! लाखभर उमेदवारांचे दोन-तीन पदांसाठी अर्ज
आरोग्य विभागाची परीक्षा ठरलेल्या वेळेतच!
आरोग्य विभागाची परीक्षा ठरलेल्या वेळेतच!esakal
Updated on
Summary

प्रवेशपत्रातील घोळामुळे ऐनवेळी रद्द झालेली सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा 24 ऑक्‍टोबर व 31 ऑक्‍टोबरला होणार आहे.

सोलापूर : प्रवेशपत्रातील घोळामुळे ऐनवेळी रद्द झालेली सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा (Public Health Department Exam) 24 ऑक्‍टोबर व 31 ऑक्‍टोबरला होणार आहे. मात्र, एकाच उमेदवाराला दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतील केंद्रे आली आहेत. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आठ लाख 12 हजार उमेदवारांपैकी एक लाख 17 हजार उमेदवारांनी विविध पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने त्यांना एकापेक्षा अधिक प्रवेशपत्र वितरीत झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य मिशनचे (National Health Mission) संचालक डॉ. सतीश पवार (Dr. Satish Pawar) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

आरोग्य विभागाची परीक्षा ठरलेल्या वेळेतच!
दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश!

सावर्जनिक आरोग्य विभागातील गट "क' व "ड' संवर्गाची नऊ हजार 657 पदांची भरती प्रक्रिया "न्यासा' कंपनीमार्फत राबविली जात आहे. डिसेंबर 2021 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पदांचा अंदाज घेऊन ही पदभरती केली जात आहे. 24 ऑक्‍टोबरला दोन सत्रात होणाऱ्या परीक्षेसाठी चार लाख पाच हजार उमेदवार तर 31 ऑक्‍टोबर रोजी चार लाख सात हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. उमेदवारांना नाहक त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यासंदर्भात कंपनी व्यवस्थापकांना राज्य सरकारने सूचना केल्या आहेत. "न्यासा' कंपनी ही काळ्या यादीतील असल्याने वशिलेबाजीची शक्‍यता काही उमदेवारांनी वर्तविली. त्यामुळे ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, आता परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिका आरोग्य विभागाने घेतली आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड होईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीची परीक्षा 24 व 31 ऑक्‍टोबरला तीन सत्रात परीक्षा होईल. 24 रोजी सकाळ व दुपारच्या सत्रात तर 31 ऑक्‍टोबरला एकाच सत्रात परीक्षा होणार आहे. एक लाखाहून अधिक उमेदवारांनी विविध पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने त्यांना दोन प्रवेशपत्र वितरीत झाले आहेत.

- डॉ. सतीश पवार, संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई

आरोग्य विभागाची परीक्षा ठरलेल्या वेळेतच!
UGC ने जाहीर केली NET पात्र उमेदवारांसाठी भरती!

...तर परीक्षेसाठी लागतील 125 आठवडे

सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, काही उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज केले आहेत. तर काही उमेदवारांनी दोन-तीन पदांसाठी अर्ज केले आहेत. त्या प्रत्येकाला त्या त्या पदांची परीक्षा देण्याची संधी देण्याचे ठरविले तर किमान 78 ते 125 आठवडे (रविवार) लागतील. आरोग्य विभागाने त्याचा आढावा घेतला, परंतु ते अशक्‍य असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.