आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा होणार रद्द? जाणून घ्या कारण

आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा होणार रद्द? जाणून घ्या कारण
सार्वजनिक आरोग्य विभाग
सार्वजनिक आरोग्य विभागsakal
Updated on
Summary

31 ऑक्‍टोबरला होणारा पेपर पुढे ढकलला जाणार आहे. परंतु, त्यासंदर्भातील निर्णय वरिष्ठांना विचारूनच फायनल केला जाईल.

सोलापूर : आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे उमेदवारांचा राज्य सरकारबद्दल रोष वाढला आहे. त्यामुळे पुढील परीक्षेपूर्वी आरोग्य विभागाला ठोस नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील, तेवढ्यातच 30 ऑक्‍टोबरपासून शाळा बंद होणार असून, शिक्षकांना दिवाळी (Diwali) सुट्टी लागणार आहे. त्यामुळे 31 ऑक्‍टोबरला होणारा पेपर पुढे ढकलला जाणार आहे. परंतु, त्यासंदर्भातील निर्णय वरिष्ठांना विचारूनच फायनल केला जाईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभाग
UPSC करणार सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी पदांची भरती!

राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शासकीय रिक्‍त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली आहे. त्यापैकी 'न्यासा' या कंपनीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रवेशपत्रातील गोंधळामुळे नियोजित परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली. त्यावेळी उमेदवारांनी ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घ्यावी, अशी मागणी केली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही तशी अपेक्षा व्यक्‍त केली. मात्र, 'न्यासा'कडेच परीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. आता परीक्षा व्यवस्थित पार पडेल, कोणतीही गडबड- गोंधळ होणार नाही, अशी ग्वाही कंपनीने आरोग्य विभागाला दिली. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड, साकिनाका, कोल्हापूर, नागपूर, नाशिक येथील काही केंद्रांवर गोंधळ उडाला. या परीक्षेतील त्रुटी दूर करून पुढील परीक्षा सुरळीत पार पडावी, जेणेकरून उमेदवारांचा सरकार विरोधातील रोष वाढणार नाही, असे नियोजन आरोग्य विभाग करीत आहे. त्यामुळे आगामी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. तरीही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमधील 48 जणांची फेरपरीक्षा

पिंपरी- चिंचवड केंद्रांवरील 48 उमेदवारांना अवैद्यकीय सहाय्यक पदासाठीची प्रश्‍नपत्रिका देण्यात आली. वास्तविक पाहता त्या विषयासाठी ते केंद्रच नव्हते. त्यामुळे त्या उमेदवारांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. पुण्यासह जवळपास 13 केंद्रांवर कंपनीचे पर्यवेक्षकच आले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यवेक्षक म्हणून भूमिका बजावली.

सार्वजनिक आरोग्य विभाग
UGC मध्ये NET पात्र उमेदवारांना नोकरीची संधी! 80 हजार रुपये वेतन

परीक्षा सुरळीत व्हावी, उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून 7 ऑक्‍टोबरपासून 'न्यासा'च्या वरिष्ठांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जात होता. तरीही, काही केंद्रांवर पर्यवेक्षक आले नाहीत. एका केंद्रावर दुसऱ्याच विषयाचा पेपर देण्यात आला. या संपूर्ण गोंधळाची माहिती घेतली असून त्यासंदर्भात वरिष्ठांकडून सकारात्मक निर्णय होईल.

- डॉ. सुरेश पवार, संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय नाही
31 ऑक्‍टोबरला आरोग्य विभागाच्या पद भरतीची पुढील परीक्षा होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भात अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही, असे स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.