गडहिंग्लज : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली. यात विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा ट्रेंड बदलत असल्याचे स्पष्ट झाले. पारंपरिक यांत्रिकी अभ्यासक्रमापेक्षा कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय करता येईल, अशा अभ्यासक्रमाकडे (कोर्स) विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसत आहे.
इलेक्ट्रिकल, ड्रेस मेकिंग, काँप्युटर हार्डवेअर अँन्ड मेन्टेन्स, काँप्युटर ऑपरेटर, मेकॅनिकल ड्राप्टसमन, डिझेल मेकॅनिक या अभ्यासक्रमांना जास्त पसंती आहे. परिणामी, पहिल्या फेरीतच या अभ्यासक्रमाचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. यातून विद्यार्थ्यांची कौशल्यातून स्वयंरोजगाराची मानसिकता अधोरेखित झाली आहे.
आयटीआयमध्ये यांत्रिकी टर्नर, फिटर, वेल्डर अशा कोर्सना नेहमीच पसंती असते. यंदा यात बदल होत असल्याचे कोर्सला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून दिसत आहे. खासकरुन ज्या कोर्समधून स्वतःचा व्यवसाय करता येईल, अशांना विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे.
सगळीकडेच काँम्प्युटरचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काँम्युटरशी संबधित कोर्सना मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिकल, वायरमन, डिझेल मेकॅनिक अशा कोर्सलाही पसंती अधिक आहे. यातून नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय करण्याची मानसिकता वाढत असल्याचे स्पष्ट आहे.
"कोरोनामुळे विद्यार्थी, पालकांच्या मानसिकतेत फरक पडत आहे. मुख्यत्वेः कमी कालावधीचा कोर्स करण्याकडे कल वाढत असल्याने प्रवेशाचा ट्रेंडमध्ये बदलाची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर कोर्सेसही पूर्ण भरले जातील."- प्राचार्य महेश आवटे, शासकीय आयटीआय, गडहिंग्लज
सर्वाधिक मागणी असणारे कोर्स
कोर्स : मागणीची टक्केवारी
इलेक्ट्रिशियन : १०६
ड्रेस मेकिंग : १०४
काँप्युटर हार्डवेअर अँन्ड मेन्टेन्स : १०२
काँप्युटर आँपरेटर : १०२
फिटर : १०२
डिझेल मेकॅनिक : १०२
मेकॅनिकल ड्राप्टसमन : १०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.