सरकारी बॅंकांमध्ये 7,858 लिपिक पदांची भरती! आज शेवटची संधी

सरकारी बॅंकांमध्ये 7,858 लिपिक पदांची भरती! अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी
सरकारी बॅंकांमध्ये 7,858 लिपिक पदांची भरती! उद्या शेवटची संधी
सरकारी बॅंकांमध्ये 7,858 लिपिक पदांची भरती! उद्या शेवटची संधीSakal
Updated on
Summary

तुम्ही सरकारी बॅंकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उद्यापर्यंत (ता. 27) संधी आहे.

सोलापूर : तुम्ही सरकारी बॅंकेत (Government bank) नोकरी (Jobs) शोधत असाल तर तुमच्यासाठी उद्यापर्यंत (ता. 27) संधी आहे. Institute of Banking Personnel (IBPS) ने लिपिक पदांसाठी भरती (Recruitment) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत एकूण 7,858 पदांची भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या, 27 ऑक्‍टोबर 2021 रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत, या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार त्वरित ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सरकारी बॅंकांमध्ये 7,858 लिपिक पदांची भरती! उद्या शेवटची संधी
पॉर्नहबवर 'हा' शिक्षक गणित शिकवतोय! करतोय दरवर्षी दोन कोटींची कमाई

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर भेट द्यावी लागेल आणि अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी राज्यनिहाय आणि बॅंकनिहाय IBPS लिपिक रिक्त जागा 2021 तपासणे आवश्‍यक आहे. या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.

या तारखा लक्षात ठेवा

  • अधिसूचना जारी तारीख : 6 ऑक्‍टोबर 2021

  • अर्ज प्रक्रियेला प्रारंभ तारीख : 7 ऑक्‍टोबर 2021

  • नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस : 27 ऑक्‍टोबर 2021

असा करा अर्ज

लिपिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर मेन पेजवर उपलब्ध IBPS Clerk अर्ज फॉर्म लिंकवर क्‍लिक करा. त्यानंतर वैयक्तिक आणि संपर्क तपशील प्रविष्ट करून IBPS लिपिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. आता IBPS लिपिक नोंदणीनंतर अर्जदाराला त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर मिळेल. त्यानंतर IBPS लिपिक अधिसूचनेत नमूद केल्यानुसार स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी विहित नमुन्यात अपलोड करा. त्यानंतर IBPS Clerk 2021 च्या अर्जामध्ये शैक्षणिक तपशील आणि इतर महत्त्वाची माहिती प्रविष्ट करा. आता अंतिम सबमिशन करण्यापूर्वी एकदा IBPS लिपिक अर्ज फॉर्म 2021 फॉर्म तपासा. पुढे IBPS लिपिक अर्ज फी भरा. पुढील वापरासाठी IBPS लिपिक अर्जाची प्रिंटआउट घ्या.

सरकारी बॅंकांमध्ये 7,858 लिपिक पदांची भरती! उद्या शेवटची संधी
CBSE लवकरच जारी करेल 10वी-12वी टर्म 1 बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र

यावर्षी IBPS ने लिपिकांच्या रिक्त पदांच्या भरतीकरिता दोनदा सुधारणा केली आहे. यापूर्वी IBPS ने IBPS च्या सहभागी बॅंकेत लिपिक पदांच्या एकूण 5,830 रिक्त पदांची घोषणा केली होती, जी दुसऱ्या पुनरावृत्तीनंतर 7,858 पर्यंत वाढवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.