Time Management : वेळेचे नियोजन काळाची गरज!

वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश मिळू शकते.
time management to student and personal life its benefits
time management to student and personal life its benefits Sakal
Updated on

- प्रा. सुभाष शहाणे

जीवनामध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश मिळू शकते.

विद्यार्थ्यांसाठी वेळेचे नियोजन

  • शाळा-महाविद्यालयाच्या वेळापत्रकाप्रमाणे आणि विषयावर घरच्या अभ्यासाचे पुस्तकातील अभ्यासक्रमानुसार (वाचन-लेखन-पाठांतराचे) नियोजन करावे.

  • शिक्षकांनी दररोज शिकवलेला अभ्यास त्याच दिवशी घरी पक्का करावा. परिक्षेसाठी अभ्यासक्रम व उपलब्ध वेळ यांची सांगड घालावी.

  • पाठ्यक्रमाबरोबरच योग्य करिअर-स्पर्धा परीक्षेचाही विचार करावा. या परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक पहावे. त्याप्रमाणे परीक्षेचा फॉर्म भरावा व वेळेचे नियोजन करावे.

व्यक्तिगत जीवनात वेळेचे नियोजन

  • दररोज झोपेतून उठल्यावर दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे व रात्री झोपण्यापूर्वी त्यापैकी कोणकोणती कामे केली त्याचा आढावा घ्यावा.

  • यामध्ये व्यायाम, योगासने, फेरफटका, खेळ, मनोरंजन लेखन, टी.व्ही., बातम्या, मित्रमंडळी, कार्यक्रम, सिनेमा-नाटक, पर्यटन, देवदर्शन, उत्सव साजरे करणे, छंद जोपासणे, वाचन याचा विचार करावा.

  • व्यक्तिगत कामाचे वेळ नियोजन करताना पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रथम दैनंदिन कामाची सूची किंवा शेड्युल तयार करा. या सूची प्रमाणेच काम करा व त्याचे काटेकोरपणे पालन करा.

  • महत्त्वाच्या कामांना अग्रक्रम द्या. जास्त जबाबदारीच्या कामांना प्राधान्य द्या. प्रत्येक कामासाठी वेळमर्यादा किंवा कालावधी निश्चित करा. कामाचा आढावा घ्या आणि वेळेत काम पूर्ण करा.

वेळेच्या नियोजनाचे फायदे

१. ध्येय-धोरणे निश्चित करता येतात.

२. विशिष्ट महत्त्वाच्या कामांना अग्रक्रम देणे शक्य होते.

३ . स्वतःला संघटित व शिस्तबद्ध ठेवता येते.

४. कामाचा ताणतणाव कमी होते.

५. अनावश्यक कामे, जबाबदारी टाळता येते.

६. शिस्तबद्ध नियोजन करता येते.

७. नावलौकिक वाढविण्यास मदत होते.

८. वैयक्तिक समाधान व व्यावसायिक यश सहज मिळते.

९. नावीन्यात सुधारणा होते.

१०. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन शक्य

अशा रितीने वेळेचे नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यक्तिमत्त्व विकासात तसेच कौशल्य विकासात वेळेच्या नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच आपण वेळेचा आदर करा, वेळेचे पालन करा, वेळेत काम करा, वेळेबरोबर रहा आणि प्रगती करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.