तुमचा रेझ्युमे प्रभावशाली बनवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

सगळीकडे होणाऱ्या चुकांमुळे तुमचा रिझ्युमे रिजेक्ट करण्याची शक्यता अधिक आहे
resume
resume
Updated on

औरंगाबाद - रिझ्युमे बनवताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तसेच सगळीकडे होणाऱ्या चुकांमुळे तुमचा रिझ्युमे रिजेक्ट करण्याची शक्यता अधिक आहे. नोकरी मिळण्यात रिझ्युमे महत्त्वाची भूमिका बजावतो. या माध्यमातून ना केवळ नोकरी देणाऱ्याला तुमची पात्रता कळते तर तुम्ही संबंधित नोकरीसाठी किती पात्र आहात. त्यामुळे नेहमी रिझ्युमे क्रिएटिव्ह होण्याबरोबरच प्रभावशाली व्हायला हवा. रिझ्युमे प्रभावशाली होण्यासाठी चुका करु नका. मात्र चुकांकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा तुम्ही तुमची आवडीची नोकरीला मुकाल. तर त्या चुका…

कौशल्य दाखवण्याची पद्धत

आपले अनुभव दाखवण्याऐवजी सांगणे योग्य पद्धत आहे. अनेकदा पुराव्याशिवाय त्यांना स्वतःचा अनुभव दाखवल्याने तुम्ही त्यांच्या नजरेत विश्वास गमवून बसता. त्यामुळे तुम्ही आपल्या रिझ्युमेमध्ये बझवर्ड्स वापर करा. लीडरशीप, एक्सपिरिअन्स, फोकस्ड, स्ट्रॅटेजिक आणि पॅशनेटसारखे शब्द वापरण्याऐवजी तुम्ही त्या कौशल्याचा कसा वापर करा. हा एक अनुभव शेअर करण्याची एक स्मार्ट पद्धत आहे. इतकेच नव्हे तर नोकरीची संधी देणारे तुमचे रिझ्युमे वाचण्यास इंट्रेस्टही येईल. तुम्ही तुमच्या रिझ्युमेत स्पेसिफिक आणि योग्य त्याच गोष्टी दाखवा.

रिझ्युमेमध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह

रिझ्युमेच्या टाॅपमध्ये ऑब्जेक्टिव्ह काॅलम असतो. हा काॅलम बहुतेक लोक भरतात. प्रोफेशनल समरी लिहिण्याऐवजी अनेकांना ऑब्जेक्टिव्ह लिहायला आवडते. मात्र या शब्दाचा रिझ्युमेमध्ये वापर करणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या रिझ्युमेच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी हवी हे सांगू नका. त्याऐवजी संस्था किंवा कंपनीला तुमच्या प्रोफेशनल समरीच्या माध्यमातून तुम्हाला संबंधितांनी नोकरी का द्यावी. समरीतून तुम्ही प्रोफेशनलच्या पातळीवर कोण आहात आणि तुमच्याकडे कोणते कौशल्ये आहेत. हे सांगा

रिझ्युमे कस्टमाईज करा

तुम्ही अनेक कंपन्यांसाठी एकाच वेळी अर्ज करता. त्यासाठी रिझ्युमे प्रत्येक ठिकाणी एकच पाठवता. दुसरीकडे अनेकदा रिझ्युमेची पडताळणी इलेक्ट्राॅनिक स्वरुपात केली जाते. कंपनी किंवा मुलाखतकर्त्याच्या हातात रिझ्युमे हातात येण्यापूर्वीच इलेक्ट्राॅनिक माध्यमातून पाहिले जाते. अशा वेळी जर तुमच्या रिझ्युमेच्या जाॅब डिस्क्रिप्शनमध्ये स्पेसिफाईड कीवर्ड नसेल तर साॅफ्टवेअरद्वारा दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही कंपनीत तुम्ही कोणत्याही पदासाठी उत्सुक असाल तर एकदा तुमचा रिझ्युमे कस्टमाईज नक्की करुन घ्या. प्रत्येक कंपनीत एकच एकच रिझ्युमे पाठवण्याचे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.