10th Exam Konkan
10th Exam Konkanesakal

हृदयद्रावक! वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यानंतरही जुळ्या बहिणींनी दिला पेपर; अश्रूंना रोखत दहावीच्या आव्हानाला दिलं तोंड

जीवनात अनेक संकटे येतात. येणाऱ्या संकटावर मात करत पुढे जाणे म्हणजे जीवन.
Published on
Summary

अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने घरात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यातच मंगळवारी इतिहासाचा पेपर होता. नेमकी कोणती परीक्षा द्यायची, हा बालमनाला पडलेल्या प्रश्नाने सर्वांनाच अंतर्मुख करायला लावले.

संगमेश्वर : जीवनात अनेक संकटे येतात. येणाऱ्या संकटावर मात करत पुढे जाणे म्हणजे जीवन, अशी वाक्ये अनेकदा व्याख्यानातून प्रवचनातून किंवा मंचावरून अनेकजण बोलतात; मात्र संकटे आणि दुःख काय असते, हे संकटांना सामोरे जाणाऱ्या त्या व्यक्तीलाच माहिती असते; मात्र ज्या वयात आनंदाने खेळायचे, मनसोक्त फिरायचे त्याच वयात डोंगराएवढं दुःख हृदयात घेऊन दहावीच्या इतिहासाच्या पेपरला (History Paper) सामोरे जाणाऱ्या जुळ्या बहिणींची हृदय हेलवणारी घटना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे.

संगमेश्वर तालुक्यातील रांगव-कुंभारवाडी येथील या दोन जुळ्या बहिणी तन्वी व जान्हवी दीपक कुंभार यांची दहावीची परीक्षा (10th Exam) सुरू असल्याने घरातील वातावरण पूर्णपणे परीक्षेचे होते. मंगळवारी इतिहासाचा पेपर असल्याने या दोघी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. अभ्यास पूर्ण होताच झोपण्याची तयारी सुरू असतानाच वडील दीपक कुंभार यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रात्रीच तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले; मात्र दीपक कुंभार यांचा मृत्यू झाला.

10th Exam Konkan
धक्कादायक! नाश्‍ता दिला नाही म्हणून पतीनं लोखंडी विळ्यानं वार करून पत्नीचा केला खून; मानेवर विळ्याचा वर्मी घाव

अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने घरात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यातच मंगळवारी इतिहासाचा पेपर होता. नेमकी कोणती परीक्षा द्यायची, हा बालमनाला पडलेल्या प्रश्नाने सर्वांनाच अंतर्मुख करायला लावले. वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून त्या रडत होत्या.

10th Exam Konkan
प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे, आंबोळगडचा होणार विकास; सागरी मार्गाजवळील 105 गावात उभारणार 'इतकी' विकास केंद्रे

द्विधा मन:स्थितीत मुली वडिलांना सोडण्यास तयार नव्हत्या. कारण, यापुढे आपले वडील कधीच सोबतही असणार नाहीत. त्यांचा आधार आता कायमचाच निघून जाणार, या अस्वस्थ भावनेने मुलींनी टाहो फोडला; मात्र जाणकार मंडळींनी पेपरला जाण्यासाठी त्यांची मनाची तयारी केली. कडवई भाईशा घोसाळकर हायस्कूल परीक्षा देण्यासाठी गेल्या. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. प्रवास करून इतिहासाचा पेपर त्यांनी लिहिला.

घरची परिस्थिती हलाखीची

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडिलांचे हातावरील पोट असल्याने दिवसभर रोजगार करून घर चालवत. नावालाच जमीन असल्याने उत्पन्नापेक्षा कसायला खर्च जास्त असल्याने शेती सोडली. त्यामुळे मिळेल ते काम आणि देतील ते दाम, या न्यायाने वडील काम करून संसार चालवत होते. कुटुंबात सातजण. चार मुली, आई आणि पत्नीची साथ होती. मोठ्या मुलीने शिक्षण अर्धवट सोडून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी धरली. वडिलांच्या जाण्याने कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

10th Exam Konkan
Mental Health : ..तर बाळाच्या मेंदूची वाढ खुंटून मतिमंदत्व येऊ शकतं; यासाठी कशी काळजी घ्याल?

या दोन्ही मुली सामान्य कुटुंबातील असून, हुशार व मनमिळावू आहेत. आपल्या शाळेतील सहकारी मुलींविषयी व शिक्षकांबद्दल नेहमीच आदर ठेवतात. त्यांना पुढील शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य केल्यास नक्कीच आपले कुटुंब पुढे घेऊन जातील. त्यांच्यावर आलेल्या प्रसंगात आम्ही सर्व शिक्षक संस्था सोबत आहोत.

-शेषराव अवघडे, मुख्याध्यापक, भाईशा घोसाळकर हायस्कूल

शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा व कार्यक्रमात या दोघीही सहभागी होतात. अभ्यासात त्या हुशार असून, त्यांना योग्य दिशा व सहकार्याची गरज आहे.

-सूरज कदम, वर्गशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.