Shivaji University Kolhapur
Shivaji University Kolhapuresakal

Shivaji University : ..तरच 'बीबीए'चे विद्यापीठ पातळीवर होणार प्रवेश; अभ्यासक्रमांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव

बीबीए, बीसीए, बीएमएस या पदवी (BBA, BCA, BMS Degree० अभ्यासक्रमांचे नियंत्रण सध्या विद्यापीठ (Shivaji University) अनुदान आयोगाकडे होते.
Published on
Summary

या अभ्यासक्रमांना आतापर्यंत कोणत्याही पद्धतीची सीईटी बंधनकारक नव्हती. पण, आता या वर्षीपासून ती होणार आहे.

-संतोष मिठारी

कोल्हापूर : बीबीए (Bachelor of Business Administration) अभ्यासक्रमाच्या नावात बी. कॉम. (बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन), तर बीसीएच्या (Bachelor of Computer Applications) नावामध्ये बी. कॉम. (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) असा बदल करण्याची मागणी काही संस्था, महाविद्यालयांनी केली. त्याबाबत त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने मान्यता देऊन तो अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाला पाठविला आहे. त्याला मान्यता मिळाली तरच यंदा विद्यापीठ पातळीवर या दोन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहेत.

बीबीए, बीसीए, बीएमएस या पदवी (BBA, BCA, BMS Degree० अभ्यासक्रमांचे नियंत्रण सध्या विद्यापीठ (Shivaji University) अनुदान आयोगाकडे होते. आता ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटी) सोपविले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांचा समावेश व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कक्षेत झाला आहे. या अभ्यासक्रमांना आतापर्यंत कोणत्याही पद्धतीची सीईटी बंधनकारक नव्हती. पण, आता या वर्षीपासून ती होणार आहे.

Shivaji University Kolhapur
Summer Season : भरउन्हात शक्यतो घराबाहेर पडू नका; उष्मालाटेबाबत हवामान केंद्राचं महत्त्वाचं आवाहन

या बदलानुसार विविध निकषांचे पालन करणे सोयीस्कर ठरणार नसल्याचे काही शैक्षणिक संस्था, महाविद्यालय प्रशासनाचे मत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील आतापर्यंत ३८ महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमांच्या नावात बदल करून ते सुरू करण्याचा प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाला सादर केला आहे. विद्यापीठाने संबंधित प्रस्ताव शासनाला पाठविले आहेत. शासनाने त्याला मान्यता दिली तरच यंदा विद्यापीठ पातळीवर अन्यथा एआयसीटीच्या माध्यमातून केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Shivaji University Kolhapur
Madha Lok Sabha : रणजितसिंहांना निवडून आणण्यासाठी करावं लागणार जिवाचं रान; आमदार गोरेंची प्रतिष्ठा पणाला..

म्हणून नावात बदल करण्याची मागणी

या दोन्ही अभ्यासक्रमांबाबत एआयसीटीच्या नियम, अटींचे पालन करणे कला, वाणिज्य, विज्ञान असे पारंपरिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना परवडणार नाही. नव्या बदलाने अभ्यासक्रमांच्या शुल्कातही वाढ होणार आणि ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झेपणार नाही. या विद्यार्थ्यांना कमी शुल्कात अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे या उद्देशाने बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या नावात बदल करून ते राबविण्यास शासनाकडे मान्यता मागितली आहे. याबाबत विद्यापीठाला प्रस्ताव दिला आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन शासनाने आम्हाला जून सुरू होण्यापूर्वी मान्यता द्यावी, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे सचिव डॉ. व्ही. एम. पाटील यांनी केली आहे.

आणखी ६० महाविद्यालयांचे नव्याने प्रस्ताव

विद्यापीठाशी एकूण २७६ महाविद्यालये संलग्नित आहेत. त्यापैकी कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक आणि व्यवस्थापन विद्याशाखेची एकूण १७८ महाविद्यालये आहेत. त्यातील साधारणतः ८५ महाविद्यालयांमध्ये सध्या बीबीए, बीसीए अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यामध्ये सध्या १५ हजार ८१४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्याने आणखी ६० महाविद्यालयांनी हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव विद्यापीठाला सादर केले आहेत.

Shivaji University Kolhapur
Bodybuilding Competition : रामदासचं आंतरराष्ट्रीय स्तरावर आता तिरंगा फडकवण्याचं स्वप्न; आजारावर मात करत कमावली शरीरयष्टी

विद्यापीठात सध्या शिक्षण घेणारे विद्यार्थी

  • बीबीए

  • भाग एक- १३३७

  • भाग दोन- १२२९

  • भाग तीन- ११८४

  • बीसीए

  • भाग एक- ५१००

  • भाग दोन- ४४२८

  • भाग तीन- २५३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.