Shivaji University Kolhapur
Shivaji University Kolhapuresakal

Shivaji University : 'या' दिवशी होणाऱ्या परीक्षा शिवाजी विद्यापीठाने पुढे ढकलल्या; काय आहे कारण?

शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहे.
Published on
Summary

या दिवशी लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण विद्यापीठ, महाविद्यालयांतील (Colleges) कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहे. विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. २६) आणि शनिवारी (ता. २७) होणाऱ्या बी. एस्सी., एम. एस्सी., नॅनो सायन्स, बी. व्होक आदी विविध अभ्यासक्रमांच्या ३८ परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत.

Shivaji University Kolhapur
Shiv Sena : धनुष्यबाण चिन्ह कोकणातून हद्दपार; भाजपसमोर शिंदे गट हतबल, 20 वर्षांच्या समीकरणात बदल

मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील परीक्षा विविध केंद्रांवर सुरू आहेत. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुक्रवारी, शनिवारी पूर्वीच्या नियोजनानुसार आयोजित केल्या आहेत. मात्र, या दिवशी लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण विद्यापीठ, महाविद्यालयांतील (Colleges) कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात शुक्रवारी आयोजित केलेल्या १७ परीक्षा आणि शनिवारच्या २१ परीक्षांचा समावेश आहे.

त्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्या अनुक्रमे ७ हजार १७५ आणि ७ हजार २३ इतकी आहे. या परीक्षा ज्या-त्या अभ्यासक्रमाच्या नियोजित शेवटच्या पेपरनंतर घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

Shivaji University Kolhapur
Kolhapur Lok Sabha : बळ समान, कुणाला मिळणार विजयाचा मान; पाठिराख्यांना सक्रिय करण्याचे नेत्यांसमोर आव्हान

‘बी. एस्सी. बी. एड्‌’साठी करा ३० एप्रिलपर्यंत अर्ज

‘विद्यापीठात बी. एस्सी., बी. एड्‌ (आयटीईपी) हा एकात्मिक चार वर्षांचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून सुरू होत आहे. त्यासाठीच्या नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण किंवा ज्यांनी बारावी विज्ञान शाखेची आता परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे’, अशी माहिती शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.