jee advanced 2023 result announced v c reddy tops the exam
jee advanced 2023 result announced v c reddy tops the examesakal

JEE Advanced 2023 Result : जेईई ॲडव्हान्स परीक्षेत व्ही. सी. रेड्डी पहिला

आयआयटी हैदराबाद झोनमधील व्ही. सी. रेड्डी हा ३६० पैकी ३४१ गुण मिळवीत पहिला आला आहे. तर एन. एन. भाव्या श्री ही ३६० पैकी २९८ गुण मिळवीत मुलींमध्ये पहिली आहे.
Published on

पुणे : देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेचा निकाल आयआयटी गुवाहाटी यांच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आला. देशभरातील ४३ हजार ७७३ विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत. आयआयटी हैदराबाद झोनमधील व्ही. सी. रेड्डी हा ३६० पैकी ३४१ गुण मिळवीत पहिला आला आहे. तर एन. एन. भाव्या श्री ही ३६० पैकी २९८ गुण मिळवीत मुलींमध्ये पहिली आहे.

जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी एक लाख ८९ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील सुमारे एक लाख ८० हजार ३७२ विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्समधील पेपर एक आणि दोन या परीक्षा दिल्या आहेत. त्यातील ४३ हजार ७७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एकूण पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सात हजार ५०९ विद्यार्थिनी आहेत.

jee advanced 2023 result announced v c reddy tops the exam
JEE : जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

व्ही. सी. रेड्डी यांच्यासह आयआयटी मुंबई झोनमधील दिपेन सोजित्रा, प्रियांशु कुमार (आयआयटी गुवाहाटी), आशिष कुमार (आयआयटी हैदराबाद), शंकित कुमार दास (आयआयटी खरगपूर) यांसह दहा विद्यार्थ्यांना पहिली रॅंक मिळाली आहे, अशी माहिती ‘आयआयटी गुवाहाटी’ यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

jee advanced 2023 result announced v c reddy tops the exam
JEE Advanced Result 2023 : IIT प्रवेशासाठीच्या JEE-Advanced चा निकाल जाहीर, हे आहेत टॉप 10 विद्यार्थी

आकडे बोलतात
तपशील : नोंदणी केलेले : दोन्ही पेपर दिलेले : पात्र ठरलेले
विद्यार्थी : १,४६,१११ : १,३९,७२७ : ३६,२६४
विद्यार्थिनी : ४३,६३३ : ४०,६४५ : ७,५०९
--------------------------------------------------------
तपशील : नोंदणी केलेले : दोन्ही पेपर दिलेले : पात्र ठरलेले
भारतीय विद्यार्थी : १,८८,८३३ : १,७९,६२६ : ४३,६०५
परदेशी विद्यार्थी : १२५ : १०८ : १३
ओसीआय विद्यार्थी : ७८६ : ६३८ : १५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.