Pune News : राज्यातील आणखी २१ हजार शिक्षकांच्या बदल्या

चौथी यादी जाहीर; मेअखेर नव्या शाळेवर रुजू होणार
Transfer of 21 thousand more teachers  Fourth list announced education
Transfer of 21 thousand more teachers Fourth list announced education sakal
Updated on

पुणे : राज्याच्या ग्रामविकास विभागाने सोमवारी (ता.६) रात्री उशिरा प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची चौथी यादी जाहीर केली. या यादीनुसार सवर्ग चारमधील २० हजार ७९५ शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

याआधी संवर्ग एक, दोन आणि तीनमधील मिळून एकूण १६ हजार ६०५ बदल्या झाल्या आहेत. या नव्या बदल्यांमुळे आतापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची संख्या आता ३८ हजार ४९० झाली आहे. दरम्यान, बदली झालेले सर्व शिक्षक चालू शैक्षणिक वर्षे संपेपर्यंत सध्याच्चाय शाळेवर कार्यरत राहणार आहेत. या शिक्षकांना येत्या ३१ नेनंतर सध्याच्या शाळेवरून कार्यमुक्त केले जाणार आहे.

संवर्ग चारमधील सर्वाधिक १ हजार २४६ बदल्या यवतमाळ जिल्ह्यातील तर, सर्वात कमी म्हणजेच केवळ १०५ बदल्या या भंडारा जिल्ह्यातील आहेत. शिक्षकांच्या नवीन बदली धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच बदल्या झाल्या आहेत. आतापर्यंतच्या एकूण बदल्यांपैकी याआधी संवर्ग एक, दोन आणि तीनमधील एकूण १६ हजार ६०५ बदल्या झाल्या आहेत.

यापैकी संवर्ग एकमधील सहा हजार ६९०, संवर्ग दोनमधील तीन हजार ४०० आणि संवर्ग तीनमधील ६ हजार ३१५ शिक्षकांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे तीन वर्षाच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. यापैकी पहिल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केल्याने तर, त्यानंतरचे दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविता आली नव्हती.

नव्या धोरणानुसार एकाच शाळेवर किमान पाच वर्षे केलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण २७ फेब्रुवारी २०१७ ला आणले होते. या धोरणानुसार राज्यस्तरावरून आॅनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निर्णयाला शेकडो शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

परंतु सरकारने त्यात बदल केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. नवीन महाविकास आघाडी सरकारने शिक्षक बदल्यांचे जुने धोरण बदलून शिक्षकांसाठी फायदेशीर ठरणारे, नवीन धोरण अमलात आणले होते.

आता या नव्या बदली धोरणानुसार या बदल्या झाल्या आहेत. पुणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती ४ फेब्रुवारी २०२० ला स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार हे नवीन बदली धोरण अस्तित्वात आले आहे.

जिल्ह्यातील ९१५ शिक्षकांची बदली

शिक्षकांच्या बदल्यांच्या चौथ्या यादीत पुणे जिल्ह्यातील आणखी ९१५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याआधी संवर्ग एक, दोन आणि तीनमध्ये पुणे जिल्ह्यातील ९४७ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. त्यात आता संवर्ग चारमधील आणखी ९१५ शिक्षकांची भर पडली आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १ हजार ८६२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.