दहावी-बारावीच्या 25 टक्‍के अभ्यासक्रमाला कात्री!

दहावी-बारावीच्या 25 टक्‍के अभ्यासक्रमाला कात्री! 130 दिवस ऑफलाइन शिक्षणानंतर परीक्षा
12th students exam
12th students exam sakal
Updated on
Summary

130 दिवस ऑफलाइन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) ऑफलाइन शाळा सुरू होण्यास विलंब लागला. ऑक्‍टोबरपासून ऑफलाइन वर्ग सुरू झाले तर, 23 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात शाळा (School) सुरू झाल्या. मात्र, 130 दिवस ऑफलाइन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षेपूर्वीची पूर्वतयारी झाली का?, मोबाईल नसल्याने जे विद्यार्थी चार महिने शिक्षणापासून दूर राहिले त्यांचे काय?, असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. (Twenty-five percent syllabus has been reduced for tenth and twelfth examinations)

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा (Exam) फॉर्म भरण्याची मुदत अजूनही संपलेली नाही. 18 डिसेंबरपर्यंत त्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करता येणार आहे. त्या मुदतीपर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील एक लाख 12 हजार विद्यार्थ्यांसह राज्यातील जवळपास 32 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जानेवारी अखेरीस परीक्षा केंद्रे (Exam Center) जाहीर केली जाणार आहेत. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वर्षाचा अभ्यासक्रम मोबाईलवर शिकावा लागला. या दोन्ही वर्षातील गुणांवर त्यांचे भवितव्य अवलंबून असते. बहुतेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन (Online Education) पचनी पडले नाही तर अनेकजण त्यापासून दूर राहिले. कोरोनामुळे अजूनही काही जिल्ह्यांमधील शाळा सुरू झालेल्या नाहीत. तरीही, कालावधी कमी असल्याने आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षकांची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

12th students exam
भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या!

मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचे काय?

दहावी-बारावीसाठी राज्यभरातून तब्बल 32 लाख विद्यार्थी आहेत. त्यातील किमान 30 टक्‍के विद्यार्थ्यांना कौटुंबिक परिस्थितीमुळे ऍन्ड्रॉइड मोबाईल घेता आले नसल्याची चर्चा आहे. कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांना पोहचता आले नाही. जे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर होते, त्यांना गृहभेटीतून स्वाध्याय देण्यात आले. मात्र, बहुतेक विद्यार्थ्यांनी अर्धवट स्वरूपात दिलेले स्वाध्याय शिक्षकांनीच पूर्ण केल्याचेही बोलले जात आहे. एकंदरीत ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागेल, हे निश्‍चित.

जानेवारीत विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा

दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक (Tenth and twelfth board examination Time Table) जाहीर झाले असून परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यात 115 केंद्रे असणार आहेत. दहावीसाठी साधारणपणे 60 हजार तर बारावीसाठी 52 हजारांपर्यंत विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून त्यांची वार्षिक पूर्व परीक्षा जानेवारीच्या मध्यावधीत सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. दरवर्षी पहिली सत्र परीक्षा दिवाळीपूर्वी होते. परंतु यंदा ही परीक्षा दिवाळीनंतर ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असतानाच आता लगेचच पूर्व परीक्षेची तयारी करावी लागत आहे. या परीक्षेच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

25 टक्के अभ्यासक्रमाला कात्री

कोरोनामुळे जून ते सप्टेंबर 2021 पर्यंत ऑफलाइन शाळा सुरू झाल्या नाहीत. ऑक्‍टोबरमध्ये दहावी-बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले. 23 नोव्हेंबरपासून सर्व शाळा ऑफलाइन सुरू झाल्या. कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) दहावी-बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. आता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी, 75 टक्‍के अभ्यासक्रम पूर्ण करून त्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा घेण्यासाठी शाळांना तारेवरील कसरत करावी लागत आहे.

12th students exam
Android वरील जाहिराती कायमच्या ब्लॉक करायच्यात? ही आहे सोपी पद्धत

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरून 18 डिसेंबरपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येतील. गरज पाहून दहावीसाठी मुदतवाढ दिली जाईल. कोरोनामुळे 25 टक्‍के अभ्यासक्रम कमी केला आहे.

- शरद गोसावी (Sharad Gosavi), अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड (State Board of Secondary and Higher Secondary)

कोरोनामुळे जूनपासून ऑनलाइनद्वारे अध्यापन सुरू होते. गृहभेटीद्वारे अनेक विद्यार्थ्यांकडून घटक चाचणी सोडवून घेण्यात आली. प्रत्येक शाळेने त्यांचे मूल्यमापन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होईल.

- भास्करराव बाबर (Bhaskarrao Babar), शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.