UCO Bank Jobs 2023 : युको बॅंकेत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती सुरू,असा करा अर्ज

या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
UCO Bank Jobs 2023
UCO Bank Jobs 2023 esakal
Updated on

UCO Bank Jobs 2023 : बॅंकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. युको बॅंकेने नुकतीच भरती संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, बॅंकेतील स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांवर ही भरती केली जाणार आहे.

युको बॅंकेत एकूण १२७ जागांवर ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही २७ डिसेंबर २०२३ अशी आहे. त्यामुळे, तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुमचा अर्ज भरून विहित पत्त्यावर पाठवा.

दरम्यान, युको बॅंकेच्या या अधिसुचनेनुसार, UCO बॅंकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एकूण १२७ पदांवर भरती केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

UCO Bank Jobs 2023
Government Job 2023 : दहावी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

अर्ज कसा करायचा ?

या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी UCO बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटला ucobank.com भेट द्यावी. त्यानंतर, या वेबसाईटवरील होमपेजवर जाऊन भरतीशी निगडीत असलेला ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. त्यानंतर, या डाऊनलोड केलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यातील सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून घ्या.

उमेदवारांनी या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर, हा अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांनी पत्र महाव्यवस्थापक, युको बॅंक, मुख्य कार्यालय, चौथा मजला, एच.आर.एम. विभाग,१० बीटीएम सारणी, कोलकाता, पश्चिम बंगाल – ७०० ००१ या पत्त्यावर पाठवा.

निवड प्रक्रिया

युको बॅंकेतील या पदांसाठी उमेदवारांची निवड ही उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कामाच्या अनुभवानुसार केली जाईल. त्यानंतर, निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखत आणि पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

शुल्क किती भरावे लागणार?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८०० रूपये शुल्क भरावे लागणार आहे.

तसेच, SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार इंटरनेट बॅंकिंग किंवा NEFT दवारे अर्ज फी भरू शकतात.

UCO Bank Jobs 2023
Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.