UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर, पाहा डिटेल्स

UGC NET exam
UGC NET examFile Photo
Updated on

UGC NET 2021 date : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) UGC परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोना संकटामुळे डिसेंबर 2020 सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच जून 2021 च्या अर्जाच्या प्रक्रियेला विलंब झाला होता. यावर आता तोडगा काढत दोन्ही परीक्षा एकत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. डिसेंबर 2020 सत्र परीक्षा आणि जून 2021 सत्र परीक्षेला मर्ज करण्यात आलं आहे. 6 ऑक्टोबरपासून 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत NTA च्या परीक्षा होणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

ugcnet.nta.nic.in आणि nta.ac.in या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 5 सप्टेंबर 2021 आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2021 आहे. याशाविया अर्जमध्ये सुधारणा करायची असल्यास उमेदवाराला सात सप्टेंबर ते 12 सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला आहे.

UGC NET exam
CBSE दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
UGC NET exam
CM उद्धव ठाकरेंचा जनतेला मोठा इशारा, घेतला सर्वात मोठा निर्णय

डिसेंबर 2020 सत्राची UGC NET परीक्षा दोन मे ते 17 मे 2021 या कालावधीत होणार होती. मात्र, या कालावधीत देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाटेनं हाहा: कार माजवला होता. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जून 2021 आणि डिसेंबर 2020 या परीक्षा एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे.

UGC NET exam
मॉल, रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत खुले, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

6 ऑक्टोबरपासून 11 ऑक्टोबर या दरम्यान दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते 12 अशी परीक्षा होईल, तर दुसऱ्या शिवफ्टमध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा पर्यंत परीक्षा होमार आहे. ही परीक्षा संगणक आधारित CBT पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेमध्ये २ पेपर असणार आहेत. २ पेपरमध्ये मल्टिपल चॉईस प्रश्न राहणार आहेत.

UGC NET exam
पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली, खरीप संकटात
UGC NET exam
...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.