UGC NET Result: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आज, यूजीसी अध्यक्षांनी ट्वीट करत दिली माहीती

परीक्षेचा निकाल उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन निकाल पाहू शकतात
UGC NET Exam
UGC NET ExamSakal
Updated on

यूजीसी नेट डिसेंबरच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आज म्हणजेच, UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर निकाल पाहु शकता. निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे.

UGC NET डिसेंबर 2022 परीक्षा देशभरात स्थापन केलेल्या केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. यावेळी परीक्षेसाठी 650 हून अधिक केंद्र स्थापन करण्यात आली होती. ही परीक्षा 32 शिफ्टमध्ये 16 दिवसांत 83 विषयांसाठी 5 टप्प्यांत घेण्यात आली होती. UGC NET परीक्षेत 8.34 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते.

UGC NET Exam
Ajit Pawar: अजितदादा भाजपमध्ये जाणार? एकनाथ खडसेंची म्हणाले, 'मी दादांसोबत बोललो…'

21 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर परीक्षेची प्रोविजनल उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. प्रोविजनल उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना 25 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.

UGC NET Exam
Elon Musk: “नियम पाळा नाहीतर...”,भारतातील सोशल मीडिया सेन्सॉरशिपबद्दल इलॉन मस्क यांचं मोठं वक्तव्य

आज जाहीर होणाऱ्या निकालांबाबत स्वतः यूजीसी अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे . यूजीसी अध्यक्षांनी यासदंर्भात ट्वीट करून परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्यासंदर्भात माहिती दिली आहे. यूजीसी अध्यक्षांनी ट्वीट केलं की, एनटीए (NTA) उद्यापर्यंत (13 एप्रिल) यूजीसी-नेट (UGC-NET) परीक्षा निकाल जाहीर करेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही https://ugcnet.nta.nic.in ला भेट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()