UGC NET Exam : नेट परीक्षेला अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, जाणून घ्या प्रक्रिया

नेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आज आहे.
UGC NET Exam
UGC NET Examesakal
Updated on

UGC NET Exam : देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी नेट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज आहे. ही शेवटची तारीख वाढवण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजंन्सी (राष्ट्रीय परीक्षा एजंन्सी) च्या वतीने ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते.

ही नेट परीक्षा यंदा ६ ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्याचे नियोजित आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज आहे. उद्यापासून अर्ज भरण्याची संधी उमेदवारांना मिळणार नाही.

त्यामुळे, ज्या उमेदवारांना आजपर्यंत काही कारणांमुळे अर्ज करता आले नाहीत, त्यांनी आज त्वरीत अर्ज भरावा. आज हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून उद्यापासून अर्ज भरण्याची लिंक बद करण्यात येईल.

या वेबसाईटवरून करा ऑनलाईन अर्ज

नेट परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही पात्र असालं तर तुम्हाला UGC NET च्या अधिकृत वेबसाईटवर (ugcnet.nta.nic.in)जाऊन हा अर्ज भरावा लागेल. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर होती, जी नंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे आजपर्यंत वाढवण्यात आली.

UGC NET Exam
NTA : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा वेळापत्रक

या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा

या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख बदलल्यानंतर आता एडिट विंडो १ नोव्हेंबर २०२३ ला ओपन होणार आहे. त्यामुळे, ज्या उमेदवारांना त्यांनी भरलेल्या अर्जामध्ये काही दुरूस्त्या करायच्या असतील ते १ ते ३ नोव्हेंबर या दरम्यान करू शकतील.

एकदा ही विंडो बंद झाली तर, उमेदवारांना अर्जामध्ये पुन्हा दुरूस्ती करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे, १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान तुम्ही एडिट विंडोमध्ये जाऊन तुमच्या अर्जामध्ये दुरूस्त्या करून घ्या. त्यासाठी या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा.

UGC NET Exam
Railway Recruitment : बारावीनंतर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रुप 'क' आणि 'ड'साठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

या तारखांना होणार नेट परीक्षा

सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे UGC NET ची परीक्षा ही ६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ या दरम्यान घेतली जाणार आहे. त्यापूर्वी, उमेदवारांना हॉलतिकीट आणि परीक्षेची स्लिप देण्यात येईल. या संदर्भातले अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.