UGC NET : परीक्षेचा निकाल जाहीर; केवळ ५२ हजार उमेदवार पात्र

देशभरातील सुमारे १२ लाख ६६ हजार ५०९ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
UGC NET exam
UGC NET examsakal media
Updated on

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने डिसेंबर २०२० आणि जून २०२१ च्या ‘यूजीसी नेट’ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील सुमारे १२ लाख ६६ हजार ५०९ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील सुमारे सहा लाख ७१ हजार २८८ उमेदवारांनी परीक्षा दिली आणि त्यातील केवळ ७.८ टक्के उमेदवार सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत. (UGC NET Exam Result)

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने यूजीसी नेट’ परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत आयोजित करण्यात येते. नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेचा निकाल ‘एनटीए’न जाहीर केला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या, पात्र ठरलेल्या उमेदवारांची देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी निवड केली जाते.

कोरोनाच्या संसर्गामुळे डिसेंबर २०२० आणि जून २०२१ या दोन्ही परीक्षा अपेक्षित वेळेत होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अखेर या दोन्ही परीक्षा विलीन करण्यात आल्या आणि २० नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान तीन टप्प्यात परीक्षा घेण्यात आल्या. त्यानुसार आता यूजीसी-नेट’ डिसेंबर २०२० आणि जून २०२१ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

देशातील २३९ शहरांमधील सुमारे ८३७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १२ लाख ६६ हजार ५०९ उमेदवारांनी अर्ज केला होता. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने राज्यशास्त्र, वाणिज्य, इतिहास, इंग्रजी, शिक्षणशास्त्र अशा विविध ८१ विषयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान आलेल्या जवाद चक्रीवादळामुळे परीक्षेतील काही विषयांचे पेपर हे पुढे ढकलण्यात आले होते. तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे आसाम, मेघालय, सिक्कीम आणि कनार्टक येथील उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. अशा पद्धतीने ही परीक्षा पार पडली.

यूजीसी-नेट’ परीक्षेच्या निकालाचा तपशील :

निवड पात्रता : नोंदणी केलेले उमेदवार : परीक्षा दिलेले उमेदवार : पात्र ठरलेले उमेदवार

सहाय्यक प्राध्यापक : ३,८७,१५० : १,८०,०१२ : ४३,७३०

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक : ८,७९,३५९ : ४,९१,२७६ : ९,१२७

एकूण : १२,६६,५०९ : ६,७१,२८८ : ५२,८५७

अशा झाली यूजीसी नेट’ परीक्षा :

टप्पा : कालावधी

पहिला टप्पा : २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१

दुसरा टप्पा : २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२१

तिसरा टप्पा : ४ आणि ५ जानेवारी २०२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.