UGC NET 2021: नेटची परीक्षा देणाऱ्यांना दिलासा, UGCनं दिली गुड न्यूज!

UGC_NET
UGC_NET
Updated on

UGC NET JRF : नवी दिल्ली / पुणे : यंदा मे महिन्यात  होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेआरएफची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने दिलेल्या माहितीनुसार, ही सूट फक्त या वर्षासाठी लागू असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या नेट परीक्षांसाठी ३० वर्षे वयोमर्यादा राहील, असं यूजीसीनं स्पष्ट केलं आहे. 

प्रवर्गानुसार सवलत मिळणार
यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ट्रान्सजेंडर प्रवर्गातील उमेदवार आणि महिलांना ५ वर्षांपर्यंत सवलत मिळेल. एलएलएम पदवीधरांना ३ वर्षाची सवलत मिळेल. सहायक प्राध्यापक पात्रतेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. 

दरम्यान, २ फेब्रुवारीपासून यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तर ३ मार्चपर्यंत परीक्षा फी भरण्यासाठी मुदत असणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यूजीसी नेट परीक्षांसाठीच्या तारखांची घोषणा केली होती. डिसेंबर २०२० मध्ये होणारी यूजीसी-नेट परीक्षा काही कारणास्तव घेता आली नाही. आता ही परीक्षा २, ७, १०, १२, १४ आणि १७ मे या दिवशी घेण्यात येणार आहे. 

परीक्षेचा पॅटर्न
यूजीसी-नेट/जेआरएफ या परीक्षेसाठी दोन प्रश्नपत्रिका (पेपर) असतील. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हे पेपर होतील. पहिला पेपरमध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, टीचिंग आणि जनरल रिसर्च अॅप्टिट्यूट यावर आधारीत प्रश्न विचारण्यात येतील. दुसरा पेपर संबंधित विषयाचा असेल. उमेदवार ८४ विषयांमध्ये नेटची परीक्षा देऊ शकतात. 

सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत पेपर होतील. दोन्ही पेपरसाठी ३ तास वेळ असेल. पेपर सुरू होण्यापूर्वी १ तास अगोदर उमेदवारांना परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

- NTAच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा  

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.