UP सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे वाटप

यूपी सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे मोफत वाटप
यूपी सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे मोफत वाटप
यूपी सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे मोफत वाटपSakal
Updated on
Summary

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून त्यांना नोव्हेंबरच्या अखेरीस स्मार्टफोन आणि टॅब्लेटचे वितरण करता येईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार (UP Government) राज्यातील सुमारे एक कोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना (तांत्रिक, वैद्यकीय आणि नर्सिंग संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना) मोफत टॅब्लेट आणि स्मार्टफोन (Smartphone)वितरित करण्याची योजना आखत आहे. राज्य सरकार कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना या टॅब्लेट आणि स्मार्टफोनचे वितरण करण्याचा विचार करत आहे.

यूपी सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे मोफत वाटप
दिवाळी सुट्टीचा घोळ मिटला! 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार शाळा

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून त्यांना नोव्हेंबरच्या अखेरीस स्मार्टफोन आणि टॅब्लेटचे वितरण करता येईल. मुख्य सचिव आर. के. तिवारी म्हणाले की, ही उपकरणे विद्यार्थ्यांना डिजिटलच्या बाबतीत सक्षम करतील आणि त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करतील. त्यांनी राज्यातील विद्यापीठांना त्यांच्या संलग्न महाविद्यालयातील नोंदणीकृत विद्यार्थ्यांची माहिती तयार करून जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल वितरण

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुलतानपूरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी करताना नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचे सरकार तरुणांना टॅब्लेट आणि स्मार्टफोन वितरित करेल, अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून टॅब्लेट आणि लॅपटॉप देण्यास सुरुवात करणार आहे.

यूपी सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे मोफत वाटप
डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

यूपी सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही उपकरणे खरेदी करता येत नाहीत, त्यांना 20 लाख मोफत लॅपटॉप देण्याची राज्य सरकारची योजना आहे. या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करावी. मोफत लॅपटॉप योजनेकरिता अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट upcmo.up.nic.in ला भेट द्यावी लागेल. येथे योजनेशी संबंधित तपशील आणि लिंक्‍स मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.