UPSC: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) कोरोना व्हायरसमुळे यूपीएससी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या उमेदवारांचा हा शेवटचा प्रयत्न (Attempt) होता, त्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे. पण हे सर्व उमेदवार पात्र वयोमर्यादेच्या आत असणे आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
उमेदवारांना देण्यात आलेली ही सूट फक्त एकदाच वापरता येणार आहे. केंद्र सरकार उमेदवारांना काही अटी-शर्तीवर ही संधी देत आहे. याबाबतचं एक प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं दाखल केलं असून सुप्रीम कोर्ट याबाबत सोमवारी सुनावणी घेईल.
रचना सिंह या विद्यार्थीनीने यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी आणखी एक संधी मिळावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या परीक्षेसाठी बरीच वर्षे मेहनत घेतली असून कोरोना व्हायरसमुळे परीक्षा केंद्रापर्यंत जाणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता, असं रचना म्हणाली.
गेल्या वर्षी ३१ मे रोजी नियोजित सनदी सेवा पूर्व परीक्षा कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलली होती, त्यानंतर ती ४ ऑक्टोबरला घेण्यात आली होती. ज्या उमेदवारांना यावेळेस परीक्षेला उपस्थित राहता आले नाही, त्यांना संधी देण्याबाबत सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारला सूचना केल्या होत्या, पण २२ जानेवारीला केंद्र सरकारने असमर्थता दर्शवली होती.
सरकारी आकडेवारीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेला ४,८६,९५२ उमेदवारांनी हजेरी लावली होती. ८ ते १७ जानेवारी कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी पूर्वपरीक्षेच्या आधारावर १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या वर्षी होणाऱ्या परीक्षेबाबतची अधिसूचना १० फेब्रुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.