उत्तूर गावची सुकन्या वृषाली संतराम कांबळे यांनी २५ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यश मिळविले. त्यांना ३१० वा क्रमांक मिळाला.
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Central Public Service Commission) नागरी सेवा परीक्षेत (Civil Services Examination) येथील फरहान इरफान जमादार, साळशी (ता. शाहूवाडी) येथील आशिष पाटील आणि उत्तूर (ता. गडहिंग्लज) सुकन्या वृषाली संतराम कांबळे यांनी यश मिळविले. फरहान यांना १९१, आशिष यांना १४७, तर वृषाली यांना ३१० गुणवत्ता क्रमांक मिळाला.
याशिवाय कचरवाडी (ता. इंदापूर) येथील शामल कल्याणराव भगत, यशवंत मंगेश खिलारी, सागर भामरे व सिद्धार्थ तगड यांनीही यश मिळवले असून, ते विद्या प्रबोधिनीचे स्पर्धा परीक्षा (UPSC Exam Result) केंद्राचे विद्यार्थी आहेत. फरहान व शामल यांच्या यशाने प्रि-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये गुलालाची उधळण करत दोघांचे अभिनंदन करण्यात आले.
फरहान म्हणाले, ‘मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे पदवीनंतर लगेच अभ्यासाला सुरुवात केली. तीन प्रयत्नांत अपयश आल्यानंतर चौथ्या प्रयत्नांत कसून अभ्यास केला. आज कष्टाचे सार्थक झाल्याचा आनंद आहे. चांगल्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यरत राहणार आहे.’
ताराबाई पार्क, कारंडे मळा येथील असून, चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळवले. त्यांचे शालेय शिक्षण सुसंस्कार हायस्कूलमधून झाले. त्यांना दहावीला ९२ टक्के गुण होते. त्यांनी विवेकानंद महाविद्यालयातून बारावी (८० टक्के) केले. तेथून सांगलीतील वालंचद अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग’ची पदीव घेतली. त्यांनी २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. स्वयंअध्ययन आणि विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यांचे वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला असून, आई शमीम गृहिणी आहेत.
उत्तूर : उत्तूर गावची सुकन्या वृषाली संतराम कांबळे यांनी २५ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यश मिळविले. त्यांना ३१० वा क्रमांक मिळाला. आजरा, चंदगड, गडहिंग्लज उपविभागातील त्या पहिल्या आयएएस ठरल्या आहेत. त्यांच्या यशाने उतूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
उतूर येथील मिलिंदनगरमध्ये राहणारे संतराम कांबळे नोकरी निमित्त नवी मुंबई येथील नेरुळमध्ये स्थायिक आहेत. वृषाली यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय बाळगून वाटचाल केली. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये त्यांनी राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली. त्यांनी बारावी वाणिज्य शाखेतून (९० टक्के) केले. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी त्यांनी कला शाखेतून पदवी घेताना राज्यशास्त्र विषय निवडला.
पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. बार्टीची शिष्यवृत्ती मिळाली. यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांनी दिल्ली गाठली. कोरोना काळात त्यांना यश आले नाही तरीही नाउमेद न होता त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी जोमाने अभ्यास सुरू केला. त्यांच्या यशाची माहिती मिळताच मिलिंदनगरमध्ये नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यशात आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. ध्येय साध्य होण्याबरोबर कौटुंबिक तसेच मार्गदर्शकांच्या कष्टाचे चीज झाले.
-वृषाली कांबळे.
या दोन महिन्यांमध्ये गावच्या स्नेहराज देसाई यांची पीएसआयपदी वर्णी लागली. आदित्य बामणे यांची सहायक गटविकास अधिकारीपदी निवड झाली आणि आता वृषाली यांनी यशाचे शिखर गाठले. उत्तूरवासीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे.
-किरण आमणगी, सरपंच
वृषाली यांनी जिवतोड मेहनत केली. त्याचे आज चीज झाले. त्यांचे यश उत्तूरमधील युवा वर्गाला निश्चितच प्रेरणा देईल.
-संतराम कांबळे (वडील)
बांबवडे : साळशीतील आशिष पाटील हे सध्या राजस्थान केडरमध्ये आयपीएस म्हणून रुजू आहेत. त्यांनी २०२१ मध्ये याच परीक्षेत ५६३, २०२२ मध्ये ४६३ तर आज १४७ वी गुणवत्ता प्राप्त केली. त्यांचे वडील अशोक पाटील प्राथमिक शिक्षक, तर आई गृहिणी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिरवाडी येथे झाले. ते चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरे आले होते. सुपात्रे येथील दि न्यू इंग्लिश स्कूल येथे पाचवी ते सातवी तर आठवी ते दहावीचे शिक्षण महात्मा गांधी उच्च व माध्यमिक विद्यालय (बांबवडे) येथे पूर्ण केले.
त्यानंतर पुणे येथे करून बी.टेक. करून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दिव- दमण या केंद्रशासित प्रदेशात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आयएएसची तयारी सुरू केली. गेल्या वर्षी त्यांना आयपीएस म्हणून राजस्थान केडर मिळाले होते. त्यानंतरही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवून आजचे यश मिळविले. आता ते आयएएस म्हणून नियुक्त होतील. सुरुवातीला मिळालेल्या यशात समाधानी न होता त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. जिद्दीने अभ्यास करून आज त्यांनी पुन्हा स्वतःला सिद्ध करून दाखविले.
- अशोक पाटील, वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.