UPSC Exam : चुटकीसरशी उत्तरं सांगणारा एआय बॉट

यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत 200 पैकी 175 गुण एका AI बॉटने मिळवलेत. आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी हा बॉट तयार केलाय.
exam
examE sakal
Updated on

यूपीएससी परीक्षेला लाखो मुलं बसत असतात.  या परीक्षेचा पहिला टप्पा असतो तो पूर्वपरीक्षा. ती झाली तर मुख्य परीक्षा ती झाली तर मग मुलाखत आणि त्यानंतर थेट निवड होते.

यूपीएससीसाठी अगणित खासगी शिकवण्या आहेत. पुस्तकं आहेत, अनेक शिक्षक त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत असतात.

exam
Adity Thackeray: "सुपारीवाल्या पक्षांबाबत मी..." विधानसभेपूर्वीच रंगला अदित्य-अमित ठाकरेंमध्ये सामना

पण आयटीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणलाय एक असा बॉट जो यूपीएससीत सर्वोत्तम गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करेल. आयआयटी मुंबईतून पदवी घेतलेले संस्थापक सदस्य सिद्धांत काबरा, सीईओ कार्तिकेय मंगलम यांनी हे अॅप तयार केलं आहे.

पढाई  (PadhAI)  नावाच्या AI बॉटने  100 पैकी 94 प्रश्न सोडवले. आणि 170 ते 185 या सरासरीत गुण मिळवून दाखवले. याच्याचबरोबर  OpenAI च्या ChatGPT ने सुद्धा ही परीक्षा सोडवली होती मात्र त्याला त्यात  फक्त 75 गुण मिळवता आले.

PadhAI हे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरुन तयार केलेला बॉट आहे.

exam
CSIR Net : सीएसआयआर नेट पुढे ढकलली

हे अॅप काय करतं?

या अॅपमध्ये UPSC-विशेष बातम्यातील माहिती आणि संदर्भ वापरले जातात. UPSC परीक्षा उत्तीर्ण व्हायला नेमके काय गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन त्यानुसार हे मॉडेल तयार केले आहे, असा दावा त्याच्या संस्थापकांनी केला आहे. या अॅपमधील AI ला चालू घडामोडींच्या विविध स्त्रोतांविषयक प्रशिक्षण दिले आहे शिवाय ते सतत अद्ययावत केलं जातं. त्यामुळे  UPSC सारख्या परीक्षांसाठी ते उपयोगी ठरतं. कारण या परीक्षेत चालू घडामोडी विषयाला महत्त्व आहे.

या एआय बॉटच्या माध्यमातून विद्यार्थी बातम्यां, विश्लेषणे, जुन्या प्रश्नपत्रिका, त्यातली उत्तरे,  NCERT पुस्तक सामग्री, शंका त्यांची स्पष्टीकरण अशी विविध आणि समृद्ध माहिती पुरवत असल्याचा दावा अॅप तयार करणारे करतात. हे अॅप तयार करताना आयआयटीतून शिकलेल्या आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे.

exam
Proba-3 Mission : सूर्याला लागणार आर्टिफिशियल ग्रहण; इस्रो प्लॅन करतंय मोहीम, या दोन उपग्रहांचं होणार लाँचिंग,जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.