UPSC च्या Geo Scientist मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

उमेदवारांची रोल नंबरनिहाय यादी संकेतस्थळावर उपलब्ध
Geo Scientist Mains
Geo Scientist Mainsesakal
Updated on

UPSC Geo Scientist Mains Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त भूवैज्ञानिक मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून परीक्षेचा निकाल upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिध्द केला आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता, ते संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. दरम्यान, मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची रोल नंबरनिहाय यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलीय.

Summary

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) Geo Scientist Mains परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.

असा तपासा 'निकाल'

मुख्य परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी प्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला upsc.gov.in भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या What's New विभागात जावून क्लिक करावे. आता एक नवीन पेज उघडेल. येथे आपल्याला संबंधित परीक्षेसाठी 'निकाल' या दुव्यावर क्लिक करावे लागेल. आता पुन्हा एक नवीन टॅब उघडेल. येथे मुलाखत/ व्यक्तिमत्व चाचणीसाठी निवडलेल्या उमेदवारांची रोल क्रमांकवार यादी उपलब्ध आहे. उमेदवार ती यादी तपासू शकतात. आवश्यक असल्यास, ती यादी डाउनलोड देखील करु शकतात.

Geo Scientist Mains
NTA JEE Main 2021 : NTA लवकरच प्रवेशपत्र जारी करणार

महत्वाचे : उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की त्यांची उमेदवारी तात्पुरती स्वरुपाची असून जोपर्यंत ते सर्व बाबतीत पात्र ठरत नाहीत, तोपर्यंत त्यांना 24 ऑगस्ट 2021 पासून तपशीलवार अर्ज (DAF) भरावा लागेल आणि प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसह तो ऑनलाइन सादरही करावा लागेल. तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

Geo Scientist Mains
भारतीय लष्करात बंपर भरती; तब्बल 28 हजार जागा भरणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 17 आणि 18 जुलै, 2021 रोजी संयुक्त भौगोलिक शास्त्रज्ञ मुख्य परीक्षा 2021 आयोजित केली होती. परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत पहिल्या शिफ्टमध्ये, तर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा घेतली गेली. 25 जून 2021 रोजी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.