विधिमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात. राज्य कल्याणकारी व्हावे म्हणून विधिमंडळात कायदे केले जातात, तर प्रशासन कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते..या सगळ्यात जर कायद्याप्रमाणे राज्य चालले नाही, कुणावरही अन्याय झाला, तर नागरिक न्यायपालिकेकडे न्याय मागू शकतो. विधिमंडळ आणि प्रशासन यांच्याकडून कोणत्याही चुका झाल्या, तर त्याची दाद न्यायालयात मागता येते. चौथा स्तंभ पत्रकारिता, समाजात जागृती निर्माण करण्याचे काम करतो..गरजन्यायव्यवस्था ही न्याय आणि समानतेच्या तत्त्वांचे रक्षण करते. न्यायालय संविधानाचा अर्थ लावण्यासाठी आणि सरकार संविधानाचे पालन करत असल्याची खात्री करण्यासाठी जबाबदार आहे. हा आधारस्तंभ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि कायद्याचे राज्य आहे याची काळजी घेतो.अन्याय झाल्यास मनगट आणि पैसा यांची ताकद नसली, तरी सर्वसामान्य नागरिकसुद्धा न्यायालयातून दाद मिळवू शकतो. म्हणूनच चांगले वकील व न्यायाधीश तयार होणे देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे..प्रकारजरी पक्की विभागणी नसली तरी कामाच्या प्रकारांवरून वकील हे सर्वसाधारणपणे फौजदारी व दिवाणी अशा दोन मुख्य प्रकारात विभागले जातात. काही वकील फौजदारी गुन्हे हाताळतात, तर काही दिवाणी प्रकरणे. अपघात, खून, मारामाऱ्या, दरोडे या विषयक गुन्ह्यांची प्रकरणे पाहणारे वकील ‘क्रिमिनल लॉयर’ अथवा फौजदारी वकील म्हणून ओळखले जातात.दिवाणी प्रकारात अनेक उपप्रकार आहेत जसे - नागरी, करविषयक, मालमत्ताविषयक, कामगारविषयक, कॉर्पोरेट कायद्यांविषयक, कुटुंबविषयक, संविधानविषयक, वाहतूकविषयक आदी. मालमत्तेमध्ये मालमत्तांसंबंधाचे वाद जसे मालमत्ता विभागणी, मालमत्ता कर, मालमत्ता हस्तांतरण याविषयीची प्रकरण हाताळणारे वकील असतात..वेगवेगळे करारनामे, इच्छापत्र, गहाण खते याबाबतीत अडचणी आल्यास नागरिक कायदा वकील काम बघतात. प्राप्तिकर, अबकारी कर, संपत्ती कर, मालमत्ता कर या संबंधातील प्रकरणे कर कायदा वकील हाताळतात. व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील अडचणी दूर करण्यासाठी कामगार कायद्याचे अभ्यास केलेले वकील लक्ष घालतात, तर कंपनी लॉ, कॉर्पोरेट ॲक्ट, ग्राहक संरक्षण याविषयीची प्रकरणे कॉर्पोरेट लॉ क्षेत्रातील वकील हाताळतात.अलीकडच्या काळात डेटा प्रायव्हसी व सिक्युरिटी, पेटंट, मेडिको लिगल अशी नवीनच क्षेत्रे उदयास आली आहेत. वरील विभागणी तशी बंधनकारक नाही, मात्र कायद्यांची व्यापकता खूप असल्याने अभ्यास करायला विशिष्ट प्रकारचे काम करणे सुलभ जाते..विविध कामेकामाच्या प्रकारावरूनही वकिलांचे अनेक प्रकार होतात. काही वकील केवळ अर्ज लिहून देणे, प्रकरण तयार करणे अशा प्रकारची साधी-सरळ कामे करतात, तर काही नोटरी बनून नोंदणीकरणाचे काम करतात. काही वकील अभ्यास करून वाद -प्रतिवाद तयार करतात, तर काही वकील तयार केलेल्या प्रतिवादावरून केवळ मांडणीचे काम करतात. असे असले तरी कोणत्याही वकिलाचा कायद्याचा चांगला अभ्यास पाहिजेच..कायद्याच्या अभ्यासाबरोबरच कायदेतज्ज्ञाला, इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य या सगळ्या विषयांची सांगड घालावी लागते. त्यामुळे वाटते तेवढे हे क्षेत्र सोपे नाही. बारावीनंतर पाच वर्षे अभ्यास करून बीए. एलएलबी. (ऑनर्स) ही पदवी मिळवता येते किंवा इतर शाखेची पदवी घेऊन तीन वर्षाचा कायदेविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम-एलएलबी करता येतो आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी-एलएलएमदेखील मिळवता येते..कौशल्येपूर्वीच्या न्याय-निवाड्यांमधील नवनवीन तयार झालेले कायदे चांगली स्मरणशक्ती, निर्णय कौशल्य, संशोधन वृत्ती, तार्किक मांडणी करता येण्याचे लेखन व मौखिक कौशल्य व संवाद कौशल्य असले पाहिजे. काही वर्षांचा वकिलीचा अनुभव घेतल्यानंतर परीक्षा देऊन न्यायाधीशही बनता येते. स्वभाव अनुरूप काही जण वकिली चालू ठेवण्यातच धन्यता मानतात, तर काही जण न्यायाधीश होण्यासाठी प्रयत्न करतात..कायदा क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिवसेंदिवस कायदेविषयक जागरूकता वाढत असल्याने न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच आवश्यक वकिलांची संख्या व न्यायाधिशांची संख्या वाढत चाललेली आहे. सामाजिक आरोग्य स्वास्थ्यपूर्ण ठेवण्यासाठी नैतिक मूल्ये सांभाळून काम करणाऱ्यांची या क्षेत्रात अत्यंत गरज आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.