आपल्या जीवनात आणि करिअरमध्ये महत्त्वाच्या प्रत्येक गोष्टी एक किंवा अधिक आव्हानात्मक संभाषणातून कळतात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीला गती देण्याचा प्रयत्न करता, तेव्हा प्रत्येक घटनेबद्दल तुम्ही कसा विचार करता, ह्यावर अवलंबून असते. ह्यात इतरांच्या नजरेतून परिस्थिती पाहणे समाविष्ट आहे.
इतरांच्या नजरेतून परिस्थिती पाहणे हे सर्वांत महत्त्वाचे कौशल्य आहे. आपण ह्या कौशल्यावर, आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनात फारसे कष्ट घेत नाही. संस्थेतील आपल्या बहुतेक कामात लोकांसोबत काम करावे लागते. त्यामुळे, इतरांच्या गरजा ओळखण्याचे कौशल्य शिकून घेणे अत्यावश्यक ठरते. जेव्हा आपण खरोखर इतरांच्या नजरेतून परिस्थितीकडे पाहण्याचे कौशल्य शिकता, एखाद्या घटनेकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, हे समजण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला वेगळी बाजू समजू शकते जी बाजू कदाचित तुमच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळी असू शकते.
परिस्थिती पाहा
जाणकार नेते आणि कामाच्या ठिकाणी संवाद साधणारे लोक परिस्थितीकडे कसे पाहतात हे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून ते शिकतात. दुसऱ्याच्या मताचा किंवा दृष्टिकोनाचा समज आणि आदर न ठेवता सामान्य संभाषण शाब्दिक भांडणात बदलू शकते. आणि माझा असा विश्वास आहे, की आपला विशिष्ट दृष्टिकोन योग्यरित्या कसा व्यक्त करायचा हे शिकणे नेहमीच महत्त्वाचे असते, परंतु दुसऱ्याचे मत समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त त्यांच्याशी सहमत असाल ज्यांच्याशी तुम्ही सहमत आहात, तर तुम्ही काही अमूल्य दृष्टिकोन गमावू शकता.
वस्तुस्थिती समजावून घ्या
इतर व्यक्ती स्वतःच्या मताला योग्य का मानतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. वस्तुस्थिती अशी आहे, की प्रत्येकाला वाटते की तेच बरोबर आहेत; ही क्रांतिकारी संकल्पना नाही. कोणी कशावर विश्वास का ठेवत नाही?
कारण त्यांना वाटते की त्यांना जे वाटते ते सत्य आहे हे अनुभवात्मक तथ्यांवर आधारित आहे की नाही हे कोणीही बघत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तो विश्वास ठेवतो, की ते बरोबर आहेत आणि तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही बरोबर आहात, अशा संभाषणात तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही.
तुमच्यापैकी एक किंवा दोघांनीही निर्णय न घेता दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकदा आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या मुळापर्यंत पोहोचलात, की त्यांना समजून घेणे सोपे होते.
दुसऱ्याचा दृष्टिकोन समजण्यासाठी...
निव्वळ दुसऱ्याचे विचार मान्य नाहीत म्हणून ते नाकारू नका.
आपण कोणाशी बोलत आहात याचा विचार करा, कदाचित आपल्या आधीच्या अनुभवावर त्या व्यक्तीने स्वतःची मते बनवली असतील.
तुम्ही सहमत नसलात, तरी दुसऱ्यांच्या मताचा आदर करा.
तुम्हाला स्पष्टीकरण हवे असेल, तर प्रश्न विचारा, संवाद साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.