- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ
संस्कृत ही मानवी इतिहासातील सर्वांत प्राचीन भाषांपैकी एक आहे. अनेक भाषांचा उगम आणि अनेक भाषांवर संस्कृतचा प्रभाव आहे. सध्याच्या काळातील दैनंदिन वापरामध्ये अत्यल्प प्रमाण असूनदेखील ही भाषा अजूनही सन्मानाचे स्थान राखून आहे. संस्कृत भाषा ही ज्ञानाचे भांडार आहे. इतिहासापासून योग- आयुर्वेदापर्यंत आणि खगोलशास्त्रापासून गणितापर्यंत अनेक विद्याशाखांचा खजिना संस्कृतमध्ये पाहायला मिळतो.