‘द लँड’ म्हणजे काय? जाणून घ्या जर्मनी देशागमनाची सोपी परिभाषा

जर्मनीने आपल्या राज्यातील नवतरूणांसाठी ही संधी आणली आहे. लवकरच याची सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी ‘द लँड’ ही मोहिम काय आहे, तिचा उद्देश काय आहे, ती महाराष्ट्रातील तरूणांसाठी कशी फायदेशीर ठरणार आहे, याबद्दल अधिक माहिती घेऊयात.
The land project
The land project
Updated on

आजवर तुम्ही भारतातील काही कंपन्या देशवासियांना नोकरीच्या संधी देतात हे ऐकलं होतं. पण, आता जर्मनीतील काही कंपन्यांनी भारतीयांसाठी एक नवा प्लॅटफॉर्म उभारला आहे. तो म्हणजे द लँड हिअर. याचा अर्थ असा की, आमच्या देशात या, पहा, नोकरी करा अन् इथेच स्थायिक व्हा.

जर्मनी सारख्या प्रगतीपथावर असलेल्या देशात काम करायाला कोणाला आवडणार नाही. त्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. पण, तुम्हाला माहितीये का, जर्मनीतील कंपन्या स्वत: तुमच्या स्वागतासाठी हजर असणार आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

जर्मनीने आपल्या राज्यातील नवतरूणांसाठी ही संधी आणली आहे. लवकरच याची सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी ‘द लँड’ ही मोहिम काय आहे, तिचा उद्देश काय आहे, ती महाराष्ट्रातील तरूणांसाठी कशी फायदेशीर ठरणार आहे, याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

काय आहे द लँड

जर्मनीच्या नैऋत्येला वसलेले बाडेन- वुटेम्बर्ग राज्यात जागतिक पातळीवर नावाजलेल्या मर्सिडिझ, पोर्श, बॉश किंवा सॅप यांसारख्या कंपन्यांसोबत काम करण्याची संधी महाराष्ट्रातील तरूणांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

काय आहे या मोहिमेचा उद्देश

बाडेन-वुटेम्बर्ग आता महाराष्ट्रातही 'लँड हिअर' ही मोहीम सुरू करीत आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट भारतीयांना जर्मनीमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यातही बाडेन-वुटेम्बर्गमध्ये कामासाठी प्रोत्साहन वंतांचे देणे हे आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

महाराष्ट्रात सुरू होणार ऑफीस

महाराष्ट्र आणि बाडेन-वुटेम्बर्गने नुकतेच एक संयुक्त घोषणा केली होती. पुण्यात कार्यरत असलेल्या इच्छुक कंपन्यांसाठी एक पोर्टल बनवण्यात आले आहे. त्यावर या मोहिमेविषयी अन् जर्मनीतील नोकरीच्या संधीबाबत माहिती देण्यात आली आहे.

तसेच, जर्मनीतील स्ट्युटगार्टमध्येही महाराष्ट्र सरकारचे एक ऑफिस लवकरच सुरू होत आहे, यामुळे तिथे कार्यरत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना हक्काचे ठिकाणच मिळाले आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

जर्मनी आणि बाडेन-वुटेम्बर्ग भारतातील तरूणांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे, तसेच, त्यांची आमच्या देशात गैरसोय होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ असा विश्वासही द लँड मोहिमेच्या आयोजकांकडून देण्यात आला आहे.

आजही जर्मनी आणि बाडेन-वुटेम्बर्गला कुशल मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. तसेच जर्मन रोजगार समितीच्या ताज्या अहवालानुसार, आगामी काळात ही मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळेच, भारतातील होतकरू, हुशार तरूणांनी जर्मनीकडे वळावे, त्यांनी इथे स्थायिक होऊन काम करावं अशी या आयोजकांची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.