Government Job Rules : शरीरावर टॅटू काढल्यास मिळणार नाहीत 'या' सरकारी नोकऱ्या, येथे पाहा लिस्ट...

जर तुम्ही टॅटू लव्हर असाल आणि सरकारी नोकरी देखील करू इच्छित असाल तर तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल.
Government Job Rules
Government Job Rules sakal
Updated on

सध्याच्या फॅन्सी युगात तरुणांमध्ये टॅटूची क्रेझ सुरू आहे. हात, पाय, पोट, पाठ आदी शरीराच्या अनेक भागांवर तरुण-तरुणी टॅटू काढत आहेत. मात्र, सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांना टॅटू काढणे टाळण्यास सांगितले जाते. असे म्हटले जाते कारण आपल्या देशात अनेक सरकारी नोकऱ्या आहेत ज्यात उमेदवाराच्या शरीरावर टॅटू काढण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही टॅटू लव्हर असाल आणि सरकारी नोकरी देखील करू इच्छित असाल तर तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की टॅटूमुळे तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी पात्र मानले जाणार नाही.

टॅटू काढल्यानंतर तुम्हाला कोणत्या सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत?

भारतात काही सरकारी नोकऱ्या आहेत ज्यात उमेदवार शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढू शकत नाहीत. याचा अर्थ असा की जर तुमच्या शरीरावर कुठेही टॅटू असेल तर तुम्ही खाली नमूद केलेल्या प्रमुख सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकत नाही.

भारतीय प्रशासकीय सेवा - IAS (Indian Administrative Service)

भारतीय महसूल सेवा - IRS (Internal Revenue Service)

भारतीय पोलीस सेवा - IPS (Indian Police Service)

भारतीय परराष्ट्र सेवा - IFS (Indian Foreign Service)

भारतीय हवाई दल - Indian Air Force

भारतीय तटरक्षक दल - ( Indian Coast Guard)

इंडियन आर्मी - (Indian Army)

भारतीय नौदल - ( Indian Navy)

पोलीस - (Police)

Government Job Rules
Government Job : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अशी करा तयारी

सरकारी नोकरीत टॅटू काढण्यावर बंदी का?

असे मानले जाते की टॅटूमुळे अनेक रोगांचा धोका असतो. जे लोक आपल्या शरीरावर टॅटू काढतात ते आपल्या छंदांना अधिक प्राधान्य देतात. अशा स्थितीत ते काम कमी महत्त्वाचे मानतील. याशिवाय, टॅटू असलेल्या व्यक्तीला सुरक्षा दलात नोकरी मिळत नाही, कारण पकडले गेल्यास त्याच्या टॅटूमुळे त्याची ओळख पटू शकते, जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगले नाही.

Chitra kode:

Related Stories

No stories found.