Teacher Recruitment : TET परीक्षेत सीमाभागातील परीक्षार्थींना संधी मिळणार? नोकर भरतीत 5 टक्के आरक्षण शक्य!

महाराष्ट्रात लवकरच शिक्षकांच्या तीस हजार जागा भरती केल्या जाणार आहेत.
Teacher Recruitment
Teacher Recruitmentesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र सरकारने तीस हजार शिक्षक भरतीचा अध्यादेश काढला आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षाअंतर्गत (टीईटी) पात्र उमेदवारांची पहिली ते दहावीपर्यंत शिक्षक म्हणून केली जाणार आहे.

बेळगाव : महाराष्ट्रात लवकरच शिक्षकांच्या तीस हजार जागा भरती केल्या जाणार आहेत. या जागा भरती करण्यासाठी महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत (TET Exam) सीमा भागातील अनेक परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या जीआरप्रमाणे सीमा भागातील परीक्षार्थींना नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी वाढू लागली आहे.

सीमाभागातील ८६५ गावांवर महाराष्ट्राने हक्क सांगितला आहे. त्यानुसार सीमाभागातील उमेदवारांना महाराष्ट्रातील नोकर भरतीत (Teacher Recruitment) पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तसा सरकारी ठराव करण्यात आला आहे, मात्र नोकर भरतीत सीमाभागातील उमेदवारांना (Border Areas Candidates) डावलले जात आहे.

त्यामुळे दरवर्षी विविध प्रकारच्या नोकर भरतीसाठी सरकारी परीक्षा देऊनही सीमाभागातील परीक्षार्थीना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. महाराष्ट्रात लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अनेक परीक्षार्थी पात्र आहेत. मात्र, सीमाभागातील परीक्षार्थीना आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागते.

Teacher Recruitment
Sadabhau Khot : 'फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करून लुटारूंचा बंदोबस्त करतील'

महाराष्ट्र सरकारने तीस हजार शिक्षक भरतीचा अध्यादेश काढला आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षाअंतर्गत (टीईटी) पात्र उमेदवारांची पहिली ते दहावीपर्यंत शिक्षक म्हणून केली जाणार आहे. याबाबत अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीत सीमा भागातील उमेदवारांना पाच टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे.

Teacher Recruitment
Devendra Fadnavis : शेतीपंप वीज जोडणीत मोठा भ्रष्टाचार; उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही चौकशी नाही!

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्र्यांनी याकडे लक्ष द्या, अशी मागणी वाढत आहे. उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीनी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार मध्यवर्तीने महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Teacher Recruitment
Anil Deshmukh : 'मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, माझा छळ करण्यात आला, माझ्यावर..'; देशमुखांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र सरकार सातत्याने सीमाभागातील नागरिकांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देणार आहे. महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या ८६५ गावातील परीक्षार्थींना महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नोकरीत आरक्षण द्यावे यासाठी पत्र व्यवहार केला जाणार आहे. गरज पडल्यास मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सीमा भागातील परीक्षार्थीना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील.

-प्रकाश मरगाळे, खजिनदार, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.