Employment : टाटा गृप ४५ हजार महिलांना देणार नोकऱ्या ?

टाटा समूहाच्या प्लांटमध्ये पुढील १८ ते २४ महिन्यांत ४५ हजार महिला कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाईल.
women Employment
women Employmentgoogle
Updated on

मुंबई : काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात मोबाईलचे उत्पादन होत नव्हते, पण आता जवळपास 200 मोबाईल कंपन्या भारतात त्यांचे फोन तयार करत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी भारतात आहे, जी फक्त सॅमसंगची आहे.

देशात मोबाईलचे उत्पादन होत असले तरी त्याचे सुटे भाग आणि कच्च्या मालासाठी चीन किंवा तैवानवर अवलंबून राहावे लागते. आता टाटा समूह ही साखळी तोडण्याच्या तयारीत आहे.

women Employment
ITBP recruitment : दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की टाटा समूह भारतात मोबाईल पार्ट्स तयार करेल आणि आता असे वृत्त आहे की टाटा समूह मोबाईल पार्ट्स फॅक्टरीसाठी 45,000 लोकांची भरती करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, आयफोनचे पार्ट्स सर्वप्रथम टाटाच्या कारखान्यात तयार केले जातील.

तामिळनाडूतील होसूर येथे असलेल्या टाटा समूहाच्या प्लांटमध्ये पुढील १८ ते २४ महिन्यांत ४५ हजार महिला कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाईल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कारखान्यात सध्या 10,000 कामगार आहेत, बहुतेक महिला आहेत.

women Employment
Indian Coast Guard : दहावी, बारावी आणि आयटीआय उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी

होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना ५०० एकरांवर पसरलेला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, आदिवासी समाजातून आलेल्या 5,000 महिलांना या प्लांटमध्ये नोकऱ्या मिळाल्या. या संदर्भात टाटा समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा अॅपलने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.

या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.